‘साधी माणसं’ मालिकेतील मुख्य पात्र ..

सध्या छोट्या पडद्यावर लोकप्रिय होत असलेली मालिका म्हणजेच ‘साधी माणसं’ .(sadhi manasa serial cast)या मालिकेतील होणारे बदल प्रेक्षकांना खेळवून ठेवत आहेत . या मालिकेच्या निमित्ताने दोन प्रसिद्ध चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नात्यांची गुंफत  जाणारी गोष्ट या मालिकेत दाखवत आहेत . मीरा आणि सत्या ही दोन मुख्य पात्र असले तरी या मालिकेत अनेक कलाकार आहेत . चला तर जाणून घेऊया. 

Sadhi Manasa Serial Cast : साधी माणसं मालिकेतील कलाकार

अभिनेत्री शिवानी बावकर ( Actress Shivani Baokar) ही ‘साधी माणसं’  या मालिकेत मीरा हे पात्र साकारत आहे.  शिवानीने या आधी ‘ लागीर झालं जी’  या मालिकेतून मराठी मालिका विश्वात पदार्पण केले.  तिने झी मराठीवर अलटी पलटी सुमडीत पलटी या मालिकेत पल्लवी हे पात्र साकारले होते, पण ही मालिका फार काळ चालली नाही . त्याचबरोबर तिने ‘ लवंगी मिरची ’ ही मालिका देखील केली . २०१७ साली  तिचा ‘ उंडगा  ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ह्या चित्रपटांमध्ये तिने मीरा सावंत हे पात्र साकारले होते , पण तिला प्रसिद्धी  ‘ लागीर झालं जी’ या मालिकेतील शितल या पात्रामुळे मिळाली. 

अभिनेता आकाश नलावडे  ( Actor Akash Nalawade) हा  ‘साधी माणसं’  या मालिकेत सत्या हे पात्र साकारत आहे.  आकाशने पुणे   येथील सावित्रीबाई विद्यापीठातून ललित कला केंद्र मधून आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले . त्याने मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये ही काम केली आहे. आकाशने या आधी ‘सहकुटुंब सहपरिवार ’ या मालिकेद्वारे मराठी मालिका विश्वात पदार्पण केले . ’  पशा ’ ह्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले . या मालिकेत मीरा आणि सत्याचा ३६ चा आकडा आहे. 

अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Actress Supriya Pathare)  हे ‘साधी माणसं’ या मालिकेत निरुपा हे पात्र साकारत आहेत.  सुप्रियाने ह्या आधी विविध मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.  सुप्रियाने ‘ फु बाई फु’, ‘ पुढचं पाऊल ’ ,’होणार सुन मी ह्या घरची’ , ‘ अस्स सासर सुरेख बाई ’ , ‘ ठिपक्यांची रांगोळी ’ , पिंजरा अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘ गोलमाल  ’ , ‘ मोरया  ’ ,’ फक्त लढ म्हणा  ’ , ‘  बालक पालक ’, असे विविध मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 

Sadhi Manasa Serial Cast : साधी माणसं मालिकेतील कलाकार

अभिनेते प्रशांत चौडप्पा (Actor Prashant Choudappa )  हे या मालिकेत काम करत आहेत. प्रशांत चौडप्पा यांनी या आधी यांनी ‘ फुलाला सुगंध मातीचा ‘  या मालिकेत आप्पाची भूमिका साकारली होती , त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली होती. 

अभिनेत्री सानिका खरे हे या मालिकेत मीराच्या आईची भूमिका साकारत आहेत.अभिनेत्री प्रतिभा गायकवाड ही साधी माणसं या मालिकेत मीराच्या बहिणीची भूमिका असा करत आहे. त्याचबरोबर सार्थक चिरनेकर हा देखील या मालिकेत काम करत आहे 

ही मालिका सांगली शहरात आत्मविश्वास आणि मिरवणाऱ्या साध्या माणसांची ही गोष्ट आहे. सत्या आणि मीरा दोघेही एकाच गावात राहत असल्याने दोघांमध्ये होणारे सततचे भांडण हे पाहण्यासारखा आहे.

कोणत्याही परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरा जाणारा हा सत्या.. सत्याला डॉक्टर व्हायचं स्वप्न होत , पण सत्याचं  गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत आहे.  मीरा आणि सत्याच्या दोघांच्या भिन्न स्वभावाची अशी ही मालिका आहे. मीरा आणि सत्याच्या दोघांचा विवाह झाला आहे . त्याच्यात होणारे वाद , रुसवे , फुगवे पाहण्यासारखं आहे . ‘साधी माणसं’ हि सिरगादिक्का अशी ह्या तमिळ मालिकेचा रिमेक आहे. ह्या मालिकेचा रिमेक अनेक भाषांमध्ये केला आहे . 

  हे ही तुम्हांला वाचायला आवडेल.

 

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

Leave a Comment