हास्यजत्रेबाबत ओंकारने सोडले मौन ,म्हणाला काही गोष्टींमुळे मला तडजोड करावी लागत होती..

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने अनेक विनोद वीर महाराष्ट्राला दिले . यातील कलाकार सर्वांचे आवडते कलाकार आहेत, कोकणचा कोहिनूर अशी ओळख असलेला अभिनेता ओंकार भोजने.(actor onkar bhojane). महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे ओंकारला प्रसिद्ध मिळाली. या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली . ओंकारचा मोठा प्रचंड चाहतावर्ग आहे.

काही महिन्यांपूर्वी ओंकारने या शो मधून काढता पाय घेतला . ओंकारने झी मराठीवरील फु बाई फु या कार्यक्रमात एन्ट्री घेतली. आता एका वर्षानंतर ओंकार पुन्हा हास्यजत्रा या कार्यक्रमात दाखल झाला.पण त्याने अचानक महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasya jatra)का सोडली याचे प्रमुख कारण सांगितले. ओंकार  (actor onkar bhojane) सध्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे ओमकार कलावती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येते ओमकार प्रथमच अमृता खानविलकर आणि संजय जाधव यांच्यासोबत काम करताना दिसून येणार आहे.

maharashtrachi hasya jatra onkar bhojane
maharashtrachi hasya jatra onkar bhojane

या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडली आणि ‘ फु बाई फु ’ या कार्यक्रमात जाण्याचा निर्णय का घेतला याविषयी ओंकारने (actor onkar bhojane) हे भाष्य केले आहे . याविषयी बोलताना म्हणाला. ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा  हा कार्यक्रम सर्व काही सुरळीत चालू होतं , पण तो कार्यक्रम करत असताना मला दोन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या चित्रपटाचा शूटिंग मुळे आणि अनेक काही गोष्टींमुळे त्यांना तडजोड करावी लागत होती. या दरम्यान मलाही ब्रेकची गरज होती. अनेकदा माझी प्रकृती ही ठीक नसायची.

आजही मला याची तक्रार जाणवते म्हणून मी सुट्टी घेतली होती पण त्या सुट्टीचे रूपांतर कायम स्वरूपी झाले . मी फु बाई फु या कार्यक्रमात गेलो कारण मला एक तिथे फोक प्रकार करायचा होता. हा प्रकार मला हास्यजत्रेमध्ये करता आला नव्हता. ही संधी मला या कार्यक्रमाने दिली म्हणून मी तिथे गेलो विशेष म्हणजे मी या सगळ्यातून खूप काही शिकलो . सध्या माझा सर्व काही चांगलं सुरू आहे. त्याचबरोबर माझं ‘ करून गेलो गाव ’या नाटकामुळे मला हास्यजत्रेला वेळ देता येत नव्हता असा ओंकार म्हणाला.कलावती या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती दुनियादारी फेम दिग्दर्शक संजय जाधव यांनी केले आहे. चार वर्षानंतर संजय जाधव पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

      हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

Leave a Comment