स्टारप्रवाह वरील प्रसिद्ध मालिका लवकरच आपला गाशा गुंडळणार..

स्टार प्रवाह या वाहिनीवर लवकरच दोन नवीन मालिका आणि एक रियालिटी शो पाहायला मिळणार आहे. यामध्ये रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेची ‘घरोघरी मातीच्या चुली  ‘ यासोबतच शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं ‘ आणि त्याचबरोबर अंकुश चौधरी यांचा ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर – १ ‘ हा रियालिटी शो सांगितला आहे. (kunya rajachi gan tu rani will bid farewell to the audience)

‘साधी माणसं ‘  ही मालिका 18 मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७  वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे. पण सध्या स्टार प्रवाह वर सात वाजता ‘कुन्या राजाची गं  तू राणी ‘ ही मालिका प्रसारित होत आहे,  परंतु ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे असे सांगितले जात आहे.सुत्रांच्या माहितीनुसार ‘ कुन्या राजाची गं  तू राणी ‘  ही मालिका ऑफ इयर होणार आहे. १८  जुलै २०२३ रोजी ही मालिका सुरू झाली होती , परंतु फक्त आठच  महिन्यात  ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे . ‘कुन्या राजाची गं  तू राणी ‘  या मालिकेने टीआरपीमध्येही आपलं स्थान निर्माण केले आहे . परंतु ही मालिका चॅनल का बंद करत आहे हे अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे.(kunya rajachi gan tu rani will bid farewell to the audience)

आणखी वाचा :  तुझेच मी गीत गात आहे ,या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर.

तर ‘ साधी माणसं ‘  ह्या मालिकेमध्ये अभिनेता आकाश नलावडे आणि अभिनेत्री शिवानी बावकर हे एकत्र पाहायला मिळणार आहेत. आकाशने ह्याआधी स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये पशा हे पात्र साकारले होते. तर शिवाली बावकर ने या आधी लागिर झालं जी , लवंगी मिरची या मालिकेमध्ये ही प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. परंतु आता आकाश कोणत्या नव्या पात्रात प्रेक्षकांच्या समोर येणार असा प्रश्न चाहत्यांमध्ये पडला होता.(kunya rajachi gan tu rani will bid farewell to the audience)

kunya rajachi gan tu rani will bid farewell to the audience
kunya rajachi gan tu rani will bid farewell to the audience

सहकुटुंब सहपरिवार ही मालिका संपली असली तरी पशावर प्रेक्षकांचा प्रेम , जिव्हाळा अजूनही पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी आकाश पुन्हा एकदा ‘ साधी माणसं ‘ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये आकाश   सत्या  हे पात्र असा करणार आहे. (kunya rajachi gan tu rani will bid farewell to the audience) ही कथा सांगली शहरातील असून यामध्ये मीरा आणि सत्या या गोष्टीचे मुख्य पात्र आहेत. दोघांचा स्वभाव वेगवेगळा आहे . अशा विभिन्न स्वभावाची असलेली मालिका लवकरच आपल्यासमोर येणार आहे. या कथेतून त्यांची उलगडत जाणारी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. मालिकेत अजून कोण कलाकार आहेत ते मालिका प्रसारित झाल्यावरच कळेल.

     हे ही तुम्हांला वाचायला आवडेल 

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

Leave a Comment