स्टारप्रवाहवर नवीन मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला..

छोट्या पडद्यावरील मालिका ह्या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत . असं म्हणणं वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाह या वाहिनीवरील आता अजून एक नवीन मालिका सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. मालिकांमधील पात्र ही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात , त्या पात्रांसाठी प्रेक्षकवर्ग ती मालिका न चुकता पाहतात. एखाद्या वेळेस ती मालिका संपल्यानंतर ते पात्र पुन्हा कधी भेटीला येणार असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतो.(new serial coming soon on starpravah)

अशातच आता एक गाजलेली अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वाभिमान ’मालिका फेम अभिनेत्री पूजा बिरारी (actress puja birari) आणि बिग बॉस मराठी फेम अभिनेता विशाल निकम (actor vishal nikam ) यांनी स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यांना एकत्र पाहून नेटकऱ्यानी त्यांची नवीन मालिका येणार असल्याचा अंदाज बांधला.(new serial coming soon on starpravah)

आणखी वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली ‘मालिकेतील काही प्रमुख कलाकार ,चला तर जाणून घेऊया…

पूजा ही चाहत्यांमध्ये नेहमीच सक्रिय असते. तिचे बोल्ड फोटोशूट काही दिवसांपूर्वी वायरल झाले होते. पुजाने स्टार प्रवाह वरील पुरस्कार सोहळ्याला हटके अंदाजात हजेरी लावली . तिच्यासोबत विशाल निकमही पहायला मिळाला.
यावरून यांची नवीन मालिका येणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधला पण या मालिकेचा नाव काय असेल आणि ही मालिका स्टार प्रवाह वर कधी दाखल होईल हे अजूनही गुपित ठेवण्यात आले आहे.(new serial coming soon on starpravah)

puja birari new serial
puja birari new serial

त्याचबरोबर या मालिकेत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी ह्या पाहायला मिळणार आहेत. त्यासोबत अभिनेत्री अतिशा नाईक  ह्या देखील प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवर हे सर्व कलाकार मंडळी पाहायला मिळाली . या मालिकेसाठी कोणती स्टार प्रवाह वरील मालिका निरोप घेणार हे अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे.(new serial coming soon on starpravah)तर १८ मार्चपासून ‘घरोघरी मातीच्या चुली ’ आणि शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची ‘ साधी माणसं ’ही देखील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .

    हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

 

Leave a Comment