मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा कशी आहे ,चला तर जाणून घेऊया…

फेब्रुवारी महिना “प्रेमाचा महिना” म्हणून ओळखला जातो. या महिन्यात, प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात.
अशातच काही कलाकार मंडळी आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. (heroe’s love language in serials) नातं हे प्रेमाचं नुसत्या नजरेनेच होतं . सगळं काही मनातलं न बोलताच समजत. ते खरे प्रेम .( झी मराठी वरील मालिकांमध्ये नायकांची प्रेमभाषा कशी आहे ? चला तर जाणून घेऊया.

मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा  heroe’s love language in serials

काहींना प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही तर काहीजण कृतीने ते व्यक्त करतात . झी मराठीचे नायक आपलं प्रेम व्यक्त करणार आहेत त्यांची प्रेमाची भाषा…
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलारने (actor hrishikesh shelar) सांगितले. मला माझ्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवायला आवडतो आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की , मी कितीही व्यस्त असलो तरी मी माझ्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढतो . कारण मटेरियलस्टिक गोष्टींपेक्षा आठवणींचा साठा मोलाचा असतो.  नात्यांमध्ये स्वातंत्र्य असणं खूप गरजेचे आहे.  मी माझ्या त्या खास व्यक्तीला हेच सांगेन की नेहमी तुझ्यासाठी आणि तुझ्यासोबत खंबीर उभा असेन.(heroe’s love language in serials).

मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा  heroe’s love language in serials

आणखी वाचा : शिवानी बावकरची स्टार प्रवाहवर लवकरच येते नवीन मालिका.. 

मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा  heroe’s love language in serials

शिवाचा आशु म्हणजेच शाल्व  किंजवडेकर (Shalva Kinjawadekar Actor ) जो चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो . त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकदम आगळी वेगळी आहे . शाल्वने सांगितले, हा व्हॅलेंटाईनडे माझ्यासाठी खूप खास आहे . कारण माझी मालिका व्हॅलेंटाईनडे च्या दोन दिवस १२  फेब्रुवारीला प्रसारित होत आहे.  त्यासोबत माझी एंगेजमेंटची  एनिवर्सरी ही 12 फेब्रुवारीलाच असते . तर मी खूप उत्सुक आहे.  मला माझ्या प्रेमाच्या व्यक्तींना जेवण बनवून खायला घालायला खूप आवडतं . जेव्हा मला वेळ मिळतो मी काहीतरी खास बनवून प्रेसेंट करतो . त्यासोबत मला वाटतं की नात्यांमध्ये समज असली पाहिजे. (heroe’s love language in serials)

मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा  heroe’s love language in serials

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमधील अर्जुन म्हणजेच रोहित परशुराम (actor rohit parshuram) ह्याने प्रेमाची भाषा व्यक्त करताना म्हणाला , “ खरंतर प्रेम व्यक्त करायला लागलंच नाही पाहिजे. ते आपल्या वागण्या बोलण्यातून दिसतं. जेव्हा तिची मासिकपाळी वेळी तेव्हा मी सकाळी तिच्या आधी उठून एक कप चहा बनवून सोबत थोडा केक अशी डिश सजवून तिच्यासमोर धरली कि पुढचे चार दिवस तिचे खूप छान जातात. प्रत्येक वेळी आय लव्ह यु म्हणूनच प्रेम व्यक्त करायची गरज नसते, पाण्याचा २० लिटरचा जार तिने न सांगता हंड्यात ओतून दिला तर आय लव्ह यु पेक्षा जास्त प्रभाव पडतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो . हा ! हा ! हा ! मालिका करणाऱ्या कलाकारचे असे काही स्पेशल प्लान्स नाही बनत कारण अर्जुनवर आणि ‘अप्पी आमची कलेक्टर वर ’ अपार प्रेम करणारे चाहते आहेत. ”

मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा  heroe’s love language in serials

सारं काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये निशी आणि नीरजची प्रेम कथा खूपच गाजत आहे . तर जेव्हा नीरज गोस्वामीशी (Neeraj Goswami  Actor ) बोलणं झालं . त्याची प्रेमाची भाषा काय आहे . तेव्हा नीरज मनाला पटकथा लेखनामध्ये एक मन आहे की,  कॅरेक्टर इज ॲक्शन माझं असं मत आहे की प्रेम आहे हे बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वागण्यातून दिसून आलं पाहिजे.  100 वेळा आय लव यू बोलणं सोपं आहे पण जेव्हा मतभेद होता तेव्हा तुम्ही ते कशाप्रकारे सोडवता ते खूप काही सांगून जातं . (heroe’s love language in serials) तुमच्या नात्याबद्दल आणि माझ्यासाठी ते महत्त्वाचा आहे.  माझ्या जीवनातल्या त्या खास व्यक्तीला निरोप देताना मी फक्त एकच सांगेन आपल्याला खूप चांगला गोष्टी अनुभवायचा आहेत . दुनिया बघायचे आहे खूप शिकायचं आहे,  तर माझ्यावर विश्वास ठेव . आपण स्मरणात ठेवण्यासारखे आणि जपण्यासारखे जीवन बनवूया व्हॅलेंटाईन डे हा प्रतीकात्मकपणे आपल्या प्रियजनासोबत घालवण्याचा दिवस आहे आणि माझे प्रेम हे माझं काम आहे त्यामुळे मला आशा आहे की त्या दिवशी सारं काही तिच्यासाठीच शूटिंग करत असेन..

1 thought on “मालिकांमधील नायकांची प्रेम भाषा कशी आहे ,चला तर जाणून घेऊया…”

Leave a Comment