शिवानी बावकरची स्टार प्रवाहवर लवकरच येते , नवीन मालिका…

स्टार प्रवाहवर सध्या  नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये स्टार प्रवाह ही वाहिनी टीआरपी मध्ये अव्वल स्थानी आहे. स्टार प्रवाहवरील काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे ,तर काही मालिका निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत.त्यातच आता नवीन मालिका स्टार प्रवाहवर येत आहेत. काही दिवसांपूर्वी  ‘घरोघरी मातीच्या चुली ’ ह्या मालिकेचा प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला.  या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत श्वेता शिंदे दिसत आहे. ही मालिका १८  मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (shivani baokar new serial upcoming)

त्यातच आत्ता प्रसिध्द मालिका ‘ आई कुठे काय करते ? ’ ही मालिका प्रेक्षकांचा  घेणार आहे. ह्या मालिकेने ४ वर्ष  प्रेक्षकांच मनोरंजन केले . ह्या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात पोहचली.  त्यावेळेत ‘घरोघरी मातीच्या चुली ’ ही प्रसारित केली जाणार आहे . ह्या मालिकेचा शेवटचा भाग १६ ते १७  मार्चला प्रसारीत होणार आहे. आता अजून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.(shivani baokar new serial upcoming)

आणखी वाचा : ‘चला हवा येऊ द्या ’ फेम कलाकारची बॉलीवूड  मध्ये एन्ट्री….

sadhi manas new serial
sadhi manas new serial

शिवानी बावकरने (shivani baokar new serial upcoming) याआधी  ‘ लागीर झालं जी ’ या  मालिकेतून मराठी मालिका विश्वास पदार्पण केले . लागिर झालं जी ही मालिका अल्पवधीतच प्रसिद्ध झाली, त्यातील सर्व पात्र घराघरात पोहोचली . या पात्रांवर प्रेक्षकांनी मनसोक्त प्रेम केलं.  त्यानंतर शिवालीने झी मराठी वाहिनीवरील लवंगी मिरची या मालिकेमध्ये ही प्रमुख भूमिका साकारली.तर आकाश नलावडेने याआधी ‘ सहकुटुंब सहपरिवार ’ या स्टार प्रवाहवरील मालिकेमध्ये ‘पशा’ हे पात्र साकारले होते . आकाशने  ललित कला  केंद्र पुणे येथून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला . सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील पशाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.  सहकुटुंब सहपरिवार मालिका संपल्यावर आकाश कोणत्या भूमिका मध्ये दिसणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. 

आकाश नलावडे आणि शिवानी बावकर (shivani baokar new serial upcoming) यांची ‘  साधी माणसं ’ ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे , ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ह्या मालिकेच्या प्रमोने प्रेकक्षांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.  

     हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

1 thought on “शिवानी बावकरची स्टार प्रवाहवर लवकरच येते , नवीन मालिका…”

Leave a Comment