चला हवा येऊ द्या ’ फेम कलाकारची बॉलीवूड मध्ये एन्ट्री….

महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे  ‘चला हवा येऊ द्या ’. या कार्यक्रमाला जवळपास दहा वर्ष पूर्ण होतील. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान  निर्माण केलं आहे . झी मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या कार्यक्रमातील काही मंडळी प्रेक्षकांची लाडकी आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातील श्रेया बुगडेने दादर येथे स्वतःच हॉटेल सुरू केलं. अभिनयासोबतच कलाकार मंडळी आता व्यवसायाकडे वळत आहेत.(actress snehal shidam enters bollywood)

‘ चला हवा येऊ द्या  ’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्नेहल शिदम. स्नेहलने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य  गाजवले. स्नेहलचे अनेक चाहते आहेत. स्नेहलने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात विनोदी भूमिका साकारल्या  आहेत.  पण स्नेहलचे  वैयक्तिक आयुष्य खूप अडचणींना सामना करत गेले आहे. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याची कहानी सांगितली होती.(actress snehal shidam enters bollywood)

आणखी वाचा : सरोगसी विषयावर भाष्य करणारा  ‘ डिलिव्हरी बॉय ’  हा चित्रपट 

actress snehal shidam with shahid kapoor
actress snehal shidam with shahid kapoor

स्नेहल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते . नवीन काहीतरी करत चाहत्यांच्या  संपर्कात राहते.  अशातच आता स्नेहलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर करत चाहत्यांच यांचं लक्ष वेधून घेतले आहे. स्नेहलची पाऊल आता मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळताना दिसत आहेत . स्नेहलने शाहिद कपूर सोबत फोटो शेअर केला आहे .  स्नेहलने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे . (actress snehal shidam enters bollywood)

स्नेहलने इंस्टाग्राम अकाउंट वरून शाहिद कपूर सोबत फोटो शेअर करत त्याला “ कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय शाहीद कपूर आणि क्रिती सॅनन यांचा नवीन हिंदी सिनेमा “तेरी बातो में ऐसा उलझा जिया” नुकताच प्रदर्शित झाला आहे.  यात माझी एक शोटीशी भुमिका आहे . तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा . सिनेमा आणि कसा वाटतोय ते सांगा तुमच प्रेम आणि आशीर्वाद असच राहुद्या” असं कॅप्शन दिले आहे. (actress snehal shidam enters bollywood) तिच्या या फोटोवर चाहत्यानी  शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुठलाही रोल असू द्या , स्नेहल उत्तमच करणार असे तिचे चाहते  म्हणतात. स्नेहलचा  “तेरी बातो में ऐसा उलझा जिया” नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे. 

         हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

 

1 thought on “चला हवा येऊ द्या ’ फेम कलाकारची बॉलीवूड मध्ये एन्ट्री….”

Leave a Comment