‘आई कुठे काय करते !’ या मालिकेबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.

स्टारप्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते !’ लवकरच आपला निरोप घेणार आहे ,अशी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगली आहे. सोशल मीडियावर आहे याबाबत अनेक पोस्ट, रील वायरल होत आहेत. आता याबाबत स्टार प्रवाह या वाहिनीने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.‘आई कुठे काय करते !’ ही मालिका सुरू आहे. पुढेही काही काळ सुरूच राहणार या मालिकेमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे.(major change in aai kuthe kay karte serial)

‘आई कुठे काय करते !’ ही मालिका चार वर्षांपूर्वी सुरू झाली . या मालिकेच्या वेगळेपणामुळे मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले . टीआरपी मध्ये ही मालिका नेहमीच अव्वल स्थानी राहिली आहे . काही दिवसांपासून या मालिकेच्या कथानकमध्ये झालेला बदल पाहून प्रेक्षकानी मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या मालिकेचा टीआरपी घसरताना दिसत आहे. त्यातच आता स्टार प्रवाह वर नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. (major change in aai kuthe kay karte serial)

आणखी वाचा :असं हवं घर ,जुई गडकरीने पोस्ट शेअर करत म्हणाली…

major change in aai kuthe kay karte serial
major change in aai kuthe kay karte serial

‘ साधी माणसं ’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली ’या दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. यामुळे ‘आई कुठे काय करते !’ ही मालिका बंद होणार अशी चर्चा सुरू झाली, पण ही केवळ अफवा आहे. या मालिकेच्या वेळेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. (major change in aai kuthe kay karte serial)ही मालिका 18 मार्चपासून दुपारी २:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे . या मालिकेच्या जागी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू होणार आहे.आई कुठे काय करते ह्या मालिकेमध्ये प्रमुख अरुंधती केळकरच्या भूमिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर , अनिरुद्ध देशमुखच्या भूमिकेत अभिनेता मिलिंद गवळी , संजना देशमुखच्या भूमिकेत अभिनेत्री रुपाली भोसले दिसत आहेत. ह्यात अजून काही प्रमुख पात्र ही आहेत.

‘आई कुठे काय करते ! ’ या मालिकेबाबत नाराजी व्यक्त होत असली तरी घरोघरी मातीच्या चुली ह्या नव्या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.(major change in aai kuthe kay karte serial)घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये प्रमुख कलाकार दिसणार आहेत. त्याचं बरोबर शिवानी बावकर आणि आकाश नलावडे ह्यांची ‘ साधी माणसं’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये आतुरता लागली आहे.

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

1 thought on “‘आई कुठे काय करते !’ या मालिकेबाबत मोठा बदल करण्यात आला आहे.”

Leave a Comment