रूढीच्या मांडीवर विज्ञानाचा विजय ! मनोरंजनाचा पंचपदार्थ , पंचक चित्रपट

माधुरी दिक्षित आणि  डॉ. श्रीराम नेने निर्मित  जयंत जठार ,राहुल आवटे, दिग्दर्शित “पंचक” हा  चित्रपट ५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. ” पंचक “(panchak marathi movie) चित्रपट  केवळ भय आणि विनोद या शैलीत मर्यादित नाही. तो मृत्यूनंतरच्या जीवना, रूढी-परंपरांच्या महत्त्वाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या गरजेचाही विचार करतो. चित्रपट दाखवतो की, धाकधक्क करणारा भय कधी कधी स्वतः निर्माण केलेला असतो आणि समजावून बघितल्यास तो दूरही होऊ शकतो.

या कथेची सुरुवात अनंत याच्या मृत्यूपासून होते . अनंता ही व्यक्तिरेखा दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे , यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर काय काय घडत हे पाहण्यासारखं  आहे.  घरात पंचक लागल्याने आता पुढे मृत्यूचा नंबर कोणाचा असणार याची भीती घरातील सर्व सदस्यांना भेडसावत असते. घरातील सदस्य आपापल्या परीने यावर काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण अचानक माधव म्हणजेच आदिनाथ कोठारे याच्या आयुष्यात वेगवेगळे प्रश्न येतात. पण ते विनोदी आणि गमतीशीर पद्धतीने चित्रपटात उघडत जातात.ही कथा मृत्यूच्या भीतीमुळे घाबरलेल्या लोकांची आणि या भीतीचा फायदा उठवणाऱ्यांची आहे.या चित्रपटात अनुभवी सर्व कलाकार असल्याने , प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका मिश्किलपणाने दाखवली आहे. कथेच्या पूर्वार्धात अनंताला केंद्रस्थानी ठेवून कथा रंजकपणे उलगडत जाते . कथेचा उत्तराधार्थ हा विनोदी आणि उत्कंठा वाढवणार आहे.अभिनयाच्या बाबतीत चित्रपट समाधानकारक आहे.(panchak marathi movie)

हे ही वाचा :- “आजारपणाशी झुंज देत सागरचं जाऊ बाई गावात या शो मध्ये कमबॅक , सागरला पाहून स्पर्धक भावुक
panchak marathi movie
panchak marathi movie

या चित्रपटात  दिलीप प्रभावळकर ,आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, संपदा जोगळेकर-कुलकर्णी, दीप्ती देवी, नंदिता पाटकर, सागर तळशीकर,  विद्याधर जोशी ,आशिष कुलकर्णी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांचीही कामे पाहण्यासारखी आहेत. ह्या सर्व कलाकारांनी आप आपल्या भूमिकेला चोख न्याय दिला आहे. 

दिग्दर्शक जयंत जठार यांनी कोकणाच्या वातावरणाला चित्रपटात प्रभावीपणे उभं केले आहे. अंधारात घडणाऱ्या सीनमध्ये थरार निर्माण केला आहे आणि विनोदी संवादांनी हसवले आहे. पटकथा काही ठिकाणी मनाला लावून जाणारी वाटते, मात्र चित्रपटाचा संदेश प्रभावीपणे पोहोचतो. एकूणच, “पंचक”(panchak marathi movie) हा मनोरंजक आणि विचारप्रवर्तक चित्रपट आहे. तो हसवतो, थरारवतो आणि आपल्याला रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धेवर विचार करायला लावतो.भारती आचरेकर , सतीश आळेकर आणि दिलीप प्रभावळकर हे कसलेले कलाकार, त्यांच्यातली केमिस्ट्री पाहणं हा अविस्मरणीय अनुभव. .जयंत जठार  आणि राहुल आवटे  या दिग्दर्शक जोडीने संगीताचा वापर योग्य पद्धतीने केला आहे. या चित्रपटाला बॉलीवूड कलाकारांनीही पसंती दर्शवली आहे.”पंचक” या शब्दाचा अर्थ आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हा चित्रपट कुटुंबासह एकदा तरी नक्कीच पाहिला पाहिजे.

     हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

1 thought on “रूढीच्या मांडीवर विज्ञानाचा विजय ! मनोरंजनाचा पंचपदार्थ , पंचक चित्रपट”

Leave a Comment