‘ नवरदेव Bsc.Agri ‘ चित्रपटचा ट्रेलर झाला प्रदर्शित ,प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद…

नवरदेव Bsc.Agri  या चित्रपटाची  उत्सुकता गेली , कित्येक दिवसांपासून सर्वांना लागली होती. शेतकरी राजाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात  येणार आहे. शेतकऱ्याची मातीशी असलेली नाळ त्याची मेहनत , धान्य पिकवण्यासाठी असलेली तळमळ, त्याचबरोबर शेतकरी असल्यामुळे त्यांचं लग्न न जमणं, ह्याचं  विषयावर हा चित्रपट आहे. नुकताच navardev bsc agri movie trailor released. झाला आहे , या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
तरुण शेतकऱ्याची भूमिका क्षितीज दाते यांनी साकारले आहे, तर प्रियदर्शनी इंदलकर हिने या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली आहे. आता शेतकऱ्याला त्याची नवरी मिळणार की नाही हे चित्रपटगृहात जाऊनच बघावं लागेल .(navardev bsc agri movie trailor released)

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. आपल्या देशात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात शेतीसाठी खूप सोयी सवलती दिल्या गेल्या. त्यामुळे भारतात हरितक्रांती झाली.शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच नकारात्मक आहे . शेती म्हटली की आपला डोळ्यासमोर दरिद्री,  दुष्काळात होरपळलेले, कोणतेही भविष्य नसलेले शेतकरी येतात . अत्यंत मागासलेल्या अवस्थेत असलेली खेडी डोळ्यासमोर येतात. वास्तविक पाहता कोणत्याही देशाच्या प्रगतीच्या रथाचे मुख्य दोन चाके असतात. शेती आणि उद्योग ही दोन अंगे भरभराटीला आली तरच देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते. सर्वांगीण प्रगती झाली तर देशातील प्रत्येक व्यक्तीला उत्कर्ष साधता येऊ शकतो , म्हणूनच शेतीपासून दूर पळून भागणार नाही. शेतीचा विकास झाला नाही तर औद्योगिक प्रगती ही अशक्यच असते. हे लक्षात घ्यावे लागेल.(navardev bsc agri movie trailor released).
ट्रेलरची सुरुवातच धमाकेदार! गावातला मुलगा Bsc.Agri  झाला आहे , त्याच्या डोळ्यात धडक, आशा आणि जिद्द दिसते. या पहिल्या झलक नंतर चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढते.शेतकरी जीवनावर आधारित कथानक! महाराष्ट्राच्या मोठ्या भागात असलेल्या ग्रामीण वास्तवाचं दर्शन या चित्रपटात घडणार हे ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे गावागांवात चर्चा होणार हे नक्की!

हे ही वाचा. रूढीच्या मांडीवर विज्ञानाचा विजय ! मनोरंजनाचा पंचपदार्थ , पंचक चित्रपट
navardev bsc agri movie trailor released
navardev bsc agri movie trailor released

या चित्रपटाचे दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केले आहे , त्यांनी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य केले आहे. Bsc.Agri असलेल्या राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.(navardev bsc agri movie trailor released).काही दिवसांपूर्वी “लाल चिखल ” हे रॅप रिलीज करण्यात आलं, या रॅपला नेटकऱ्यानी चांगलाच प्रतिसाद दर्शवला आहे. ह्या रॅप मधील शब्द मन सुन्न करणारे  आहेत. अभिनेता क्षितीश दाते या चित्रपटात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल, त्यासोबतच प्रविण तरडे, मकरंद अनासपुरे, प्रियदर्शिनी इंदलकर, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे असे अनुभवी कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. “(navardev bsc agri movie trailor released). मनोरंजक आणि विचारप्रवत्तक आहे. ग्रामीण जीवनावर आधारित ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडू शकते. मकरंद अनासपुरे यांचा अभिनय आशादायक वाटतो. चित्रपट पाहूनच पूर्ण रिव्ह्यू करता येईल, पण ट्रेलरवरून हा चित्रपट नक्कीच पाहण्याजोगा वाटतो! हा चित्रपट २६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

      हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :

 

3 thoughts on “‘ नवरदेव Bsc.Agri ‘ चित्रपटचा ट्रेलर झाला प्रदर्शित ,प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद…”

Leave a Comment