अभिनय सोडून शेतात रमली ,मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे…

मृण्मयी देशपांडे ही बहुरुपी  प्रतिभा असलेली मराठी अभिनेत्री .. ती केवळ अभिनेत्री नसून ,दिग्दर्शिका, सूत्रसंचालक आणि नृत्यांगणा देखील आहे. तिच्या कौशल्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांना सजवले आहे.मृण्मयी देशपांडे (marathi actress mrunmayee deshpande) हे  नाव मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये घुमवल्याशिवाय राहत नाही.तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्व त्वाने  प्रेक्षकांना भुरळ घालली आहे. .

मृण्मयीला (marathi actress mrunmayee deshpande) लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. २००७ मध्ये स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिने मराठी मालिकांमध्ये पदार्पण केला. ‘कुंकू’ ही  झी मराठी मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यात तिने जानकीची भूमिका साकारली होती. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला २०१५ साली सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला. ‘मुंबई डायरीज, २६/११ ‘ या हिंदी वेब सीरीजमध्येही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या..अँकर म्हणूनही मृण्मयीने कमाल के ली आहे. ‘युवा सिंगर एक नंबर’, ‘सा रे ग म प मराठी लिटिल चॅम्प’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ आणि ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या शोमध्ये तिने सूत्रसंचालन केले आहे.

२०१६ मध्ये मृण्मयीने स्वप्नील राव यांच्याशी लग्न केले. ते एक आनंदी जोडपे आहेत.मृण्मयी तिच्या नवऱ्यासोबत महाबळेश्वरला  फार्म  हाऊसवर  शेती करते. मृण्मयी  सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून   तिच्या चाहत्यांशी नियमितपणे संपर्क साधत असते. काही दिवासापूर्वी तिने इंस्टाग्राम  लाईव येत तिने महाबळेश्वरच फार्म  हाउस दाखवले. शेती कसे करतो तेही तिने सांगितले.   

हे ही वाचा :  ‘ नवरदेव Bsc.Agri ‘ चित्रपटचा ट्रेलर झाला प्रदर्शित ,प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद…
marathi actress mrunmayee deshpande
marathi actress mrunmayee deshpande

मृण्मयी आणि स्वप्नील अधून मधून महाबळेश्वरला जात असतात , त्यांनी त्यांच्या शेतात विविध प्रकारची भाज्या सेंद्रिय पद्धतीने केल्या  आहेत.  शेतात ती मटर ,  फरसबी , टोमॅटो ,  पर्पल कोबी , बीट , कांदे , लसूण  अशी उत्पादन घेत असते. त्यांच्या शेतात झुकुनी नावाची  इंपोडेड  प्रकारची भाजी सुद्धा लावली आहे. झुकिनीच्या फुलांची भाजी करता येते आणि चवीला खूप टेस्टी लागते अशी मृण्मयी म्हणते. 100% नैसर्गिक पद्धतीने कुठल्याही प्रकारचा केमिकल फर्टीलायझर शेतामध्ये वापरलेले नाही.इंस्टाग्राम  लाईव आल्याने तिचा चाहता वर्ग खुश झाला.  खूप छान पद्धतीने , मेहनतीने शेती करताय तुम्ही, खूप भारी आहात. तिच्या चाहत्यांनी मृण्मयीला शेती करण्याला प्रोत्साहन केले .कधी कधी लाईव  येत जा , असेही तिचे चाहते म्हणाले . इंस्टाग्राम  लाईव आल्याने तिच्या चाहत्यानी  मृण्मयीला शुभेच्छा दिल्या .

       हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :

 

1 thought on “अभिनय सोडून शेतात रमली ,मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे…”

Leave a Comment