चाहत्याच्या कमेंटवर भडकली जुई गडकरी..आधी नीट माहिती काढा..नंतर बोला

जूई गडकरी ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री , जी मुख्यत्वे टेलिव्हिजनमध्ये काम करते. ती तिच्या भूमिका सहजतेने साकारत असते. जूईने तिची कारकीर्द सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरू केली, परंतु नंतर तिने अभिनयाकडे वळण घेतले. २००९ मध्ये ” श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी” या मालिकेतून तिने पदार्पण केले. त्यानंतर ती “माझिया प्रियाला प्रीत कळेना,” “तुजवीन  सख्या रे,” पुढे  २०११ साली  ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून तिने कल्याणी ही भूमिका साकारली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.आणि आत्ता ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या भूमिकांसाठी ओळखली जाते.  (amous marathi actress jui gadkari tharal tar mag serial)२०१८ मध्ये, जूई रिॲलिटी शो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. ती ४९ व्या दिवशी बिग बॉसच्या घराबाहेर पडली 

काही दिवसापूर्वी जुईने राजश्री मराठी या चॅनेलवरील Today स्पेशल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा ती म्हणाली २०२३ ह्या वर्षाने मला बराच काही दिले आहे. गेली तेरा वर्ष बेस्ट अभिनेत्री म्हणून स्वप्न पाहिलं होतं , ते २०२३ मध्ये पूर्ण झालं , त्याचबरोबर अजून काही स्वप्न होती ती काही पूर्ण झालीत. जुई ही पूर्णपणे शाहाकारी आहे,ती फुडी असून तिला खायला खूप आवडते. तिला भविष्यात स्वत:चे  रेस्टॉरंट काढायचे आहे . तिने १६ सोमवारचा उपवास करताना कोणते अनुभव आले , तेही तिने सांगितले. जुई ही १३ देश फिरली असून ती एकटी राहते आणि ती एकट्यात राहण पसंत करते.   जुईची स्वत:ची बेकरी सुद्धा आहे, ह्या बेकारी मध्ये ती वेग वेगळ्या प्रकारचे केक बनवत असते. 

आणखी वाचा: मराठी इंडस्ट्रीमधून गायब झालेली अभिनेत्री रेखा राव…सध्या काय करते ?

amous marathi actress jui gadkari tharal tar mag serial
amous marathi actress jui gadkari tharal tar mag serial

ती  सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या इंस्टाग्राम हँडलवर (juigadkariofficial) तिच्या चाहत्यांशी नियमितपणे संपर्क साधते. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील आणि मित्रांचे फोटो ती तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करत असते. ह्याच कार्यक्रमा दरम्यान या अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. एक नेटकऱ्याने “ तुझ लग्न झालय ना , मग फॅमिली फोटो शेर करत का नाहीस ? असा प्रश्न तिला विचारला. ”

नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देत जुई म्हणाली,  “ ताई जरा जमलं तर नीट माहिती मिळवा आणि मग कमेंट करा ! मला नक्कीच आवडेल माझ्या नवऱ्याचे आणि लग्नाचे फोटो शेर करायला पण आधी लग्न तर होऊ द्या ! आणि उत्तरापुढे अभिनेत्रीने हसायचे इमोजी जोडले आहेत.” ह्यावर त्या नेटकऱ्याने जुईची माफी सुद्धा मागितली आहे. ठरलं तर मग  ह्या  मालिकेने गेल्या वर्षभरापासून  टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर स्थान मिळवले  आहे. जुई नेहमीच मालिकेच्या यशाचं संपूर्ण श्रेय मालिकेच्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांना देत असते. छोट्या पडद्यावरील जुईने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

1 thought on “चाहत्याच्या कमेंटवर भडकली जुई गडकरी..आधी नीट माहिती काढा..नंतर बोला”

Leave a Comment