वयाच्या १७ व्या वर्षी अमृता सुभाष पडली होती , या कलाकाराच्या प्रेमात..

श्वास’ या सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटाद्वारे अमृता सुभाषने  मराठी चित्रपट सृष्टीत  पदार्पण केले. गलीबॉय ,वळू ,सेक्रेड गेम्स,  लस्ट स्टोरी  अशा विविध चित्रपटातून , नाटकांमधून आणि  वेब सिरीजमधून ती  प्रेक्षकांच्या भेटीला आली .. ज्येष्ठ अभिनेत्या ज्योती सुभाष यांची मुलगी अमृत सुभाष . अमृताला बालपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं , अशी स्वप्नही पडू लागली होती. घरातूनच अभिनयाचा बाळकडू मिळालेल्या अमृताचा पती देखील या क्षेत्रातील आहे. अमृता एक शास्त्रीय गायिका आहे संदेश कुलकर्णीची विवाह केला आहे. (marathi actress amruta subhash husband)चला जाणून घेऊया यांची लव स्टोरी.

नाटकाची तिला प्रचंड आवड. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अमृताची बालपणापासूनची मैत्री. एकाच क्षेत्रात असल्याने त्यांच्या सतत भेटीगाठी व्हायच्या. सोनालीच्या घरी सुद्धा येणं जाणं व्हायचं, सोनाली कुलकर्णी यांच्या घरी नाटकं बसवली जायची. एका मुलाखतीमध्ये सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले होते की , शाळेत असताना आम्ही घराच्या गच्चीवर नाटकाची तालीम करायचो. अमृता ही यामध्ये सहभागी असायची.

हे ही वाचा : बारा वर्षानंतर तेजश्री प्रधान आणि डॉ .मोहन आगाशे झळकणार चित्रपटात.. 

marathi actress amruta subhash husband sandesh kulkarni
marathi actress amruta subhash husband sandesh kulkarni

सोनालीचा वाढदिवस असल्याने अमृता तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेली, त्यावेळी अमृता ही १७ वर्षांची होती आणि तेव्हाच अमृता सोनालीच्या भावाच्या प्रेमात पडली. संदेश कुलकर्णी (marathi actress amruta subhash husband) म्हणजे सोनालीचा सख्खा भाऊ.संदेशच्या पहिल्या भेटीविषयी अमृताने सांगितले की, मी सोनालीच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेले होते .  तेव्हा तिथे सर्वात आधी तिचा भाऊ दिसला. आजही मला तसाच्या तसा आठवतो . त्याने कुर्ता घातला होता. हाताच्या बाया दुमडल्या होत्या आणि तो कुठेतरी जायला निघाला होता. तसं पाहिल्यानंतर माझ्या मनातला आवाज मला स्पष्ट ऐकू आला. हाच माझा नवरा , असं अमृता म्हणाली. 

संदेश देखील सिनेसृष्टीत  असल्याने दोघांनाही एक दुसऱ्याला फारचं समजून घेतलं. अमृताला संदेश आवडलाच नाहीतर याच्याशीच लग्न करायचं , असं अमृताने निश्चय केला. काही दिवस एकदुसऱ्याला डेट केल्यांनतर पुढे जाऊन अमृताने पुढाकार घेऊन संदेशला प्रपोज केला , संदेशने  देखील तिच्या प्रपोजला  होकार दिला . २००३ साली कुटुंबियाच्या सहमतीने दोघांनीही लग्न गाठ बांधली. दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे . काही दिवसापूर्वी अमृताची बिझी शेडूलमुळे तिची  तब्बेत बिघडली होती. तेव्हा तिला व्हीलचेअरचा सहारा घ्यावा लागत होता. तेव्हा तिला संदेश यांनी ह्यातून तिला बाहेर काढलं. दोघानेही बरेच नाटकाचे प्रयोग एकत्र केले आहे. अमृता आपल्या नवऱ्या बद्दल सोशल मिडिया वर प्रेम व्यक्त करत असते. २० वर्षाहून अधिक काळ उलटला आहे तरी ह्याच्यातील एकमेकांवरील  प्रेम अजूनही असंच आहे.  

 

1 thought on “वयाच्या १७ व्या वर्षी अमृता सुभाष पडली होती , या कलाकाराच्या प्रेमात..”

Leave a Comment