बारा वर्षानंतर तेजश्री प्रधान आणि डॉ .मोहन आगाशे झळकणार चित्रपटात..

तेजश्रीने ‘ झेंडा’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. ‘होणार सून मी ह्या घरची ’ या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.  २०११ मध्ये ‘ शर्यत ‘ या मराठी चित्रपटात काम केले आहे. तेजश्रीने साकारलेली ‘होणार सून मी ह्या घरची ’ या मालिकेतील जान्हवी कायम लोकांच्या लक्षात राहिली.होणार सून मी ह्या घरची या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना फारच आवडलं होतं. मालिकेतील नायिका जान्हवी हिच्या ड्रेसपासून ते तिच्या मंगळसुत्रापर्यंत सगळ्याच गोष्टी त्यावेळी  खूप ट्रेंड झाल्या होत्या. तर, या मालिकेतील गरीब कुटुंबातील पात्राची ही खूप वाहवा झाली होती.

अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत श्री .सुशीलकुमार अग्रवाल निर्मित संजय अमर दिग्दर्शित ‘ लोकशाही ‘  हा सिनेमा येत्या ९  फेब्रुवारी २०२४ रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे , समीर धर्माधिकारी, गिरीश ओक, भार्गवी चिरमुले, अमित रिया आणि तेजश्री प्रधान हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री  प्रधान  हिने डॉ.मोहन आगाशे यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे .(actress tejashree pradhan and dr mohan agashe featuring in the film)

हे ही वाचा : अभिनय सोडून शेतात रमली ,मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे…
actress tejashree pradhan and dr mohan agashe featuring in the film
actress tejashree pradhan and dr mohan agashe featuring in the film

हा फोटो शेअर करत  तिने म्हटले आहे की , आपण आपल्या जीवन प्रवासात लोकांना भेटतच राहतो, परंतु त्यापैकी काही लोक कायमचे लक्षात राहतात. मोहन काका नेहमीच पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. पहिला फोटो डॉ  प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यानचा आहे आणि दुसरा फोटो आमच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यानचा आहे , तिच्या ह्या फोटोमुळे तेजश्रीचा आगामी चित्रपट कोणता ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.(actress tejashree pradhan and dr mohan agashe featuring in the film)

‘ लोकशाही ‘ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर तेजश्री आणि डॉ. मोहन आगाशे या चित्रपटात असणार हे स्पष्ट झाले. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटानंतर तेजश्री प्रधान आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तब्बल बारा वर्षानंतर एकाच चित्रपटात दिसणार आहेत.संवादाप्रमाणे चेहऱ्यावरील नैसर्गिक हावभाव बदलणारी, स्वतःच्या अभिनय कौशल्यावर प्रेक्षाकांना दखल घेण्यास भाग पाडणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. चेहऱ्यावरील हावभाव हे कलाकाराच खरे वैशिष्ट्य.  नैसर्गिक अभिनय करणारी एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून तेजश्रीकडे पाहिलं जातं.काही दिवसांपूर्वी तेजश्री च्या आईचे निधन झाले , त्यातून तिने स्वतःला सावरले आहे.  तेजश्री प्रधान आता छोट्या पडद्यावर स्टार प्रवाहच्या ‘ प्रेमाची गोष्ट ‘ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे .तिने साकरलेली मुक्ता सर्वानाच आवडते आहे.

 

     हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :

 

1 thought on “बारा वर्षानंतर तेजश्री प्रधान आणि डॉ .मोहन आगाशे झळकणार चित्रपटात..”

Leave a Comment