स्टार प्रवाह वरील नावाजलेली आणि एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली मालिका म्हणजेच टिपक्यांची रांगोळी. ह्या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला . १८ नोव्हेंबर २०२३ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.२०२१ साली ही मालिका सुरू झाली होती , अल्पवधीतच ह्या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली . त्या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी मनसोक्त प्रेम केले.(swapnil kale joins kunya rajachi gan tu rani )
या मालिकेतील शशांक , अप्पू , मन्ना , बाबीआत्या , अमेय , कुक्की अशी अनेक पात्र घराघरात पोहोचली. टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आता एका वेगळ्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत झळकलेला अभिनेता स्वप्निल काळे कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे.ह्या आधी स्वप्निलने काही नाटकांमध्येही काम केले आहे. स्वप्निलने २०१८ साली ‘ काय झालं कळना ‘ ह्या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले.(swapnil kale joins kunya rajachi gan tu rani)
आणखी वाचा : पायाला आणि बोटाला अक्षरशः पिशव्या बांधल्या , मांजरेकरांनी सांगितला आजारपणाचा अनुभव…
स्वप्निलने ह्या आधी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अमेयची भूमिका साकारली होती . स्वप्नील कुन्या राजाची गं तू ह्या मालिकेतून नव्या भूमिकेत आपल्यासमोर दिसणार आहे . याबाबत स्वप्निल ने इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.स्वप्निल ने नव्या लूकची पोस्ट शेअर करत पुन्हा ॲक्शन मध्ये स्टार प्रवाह वर पहा संध्याकाळी सात वाजता कुन्या राजाची गं तू असा त्याला कॅप्शन दिला आहे.(swapnil kale joins kunya rajachi gan tu rani )स्वप्निल या मालिकेत रणजीत देशमुख च्या भूमिकेत आपल्यासमोर दिसणार आहे स्वप्नीलच्या या पोस्टवर नेटकर यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.(swapnil kale joins kunya rajachi gan tu rani) यामध्ये चेतन वळणेरे ओये , होय कडक ना भाई अशी कमेंट केली आहे त्याचबरोबर गिरीजा प्रभू ऋतुजा धरण शितल कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी स्वप्नील ला शुभेच्छा दिल्या आहेत तर ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शरद पोक्षे , सुप्रिया पाठारे , चेतन वडनेरे , अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थन , लीना भागवत , नम्रता प्रधान अशा दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :
1 thought on “सुप्रसिद्ध अभिनेता दिसणार ‘कुन्या राजाची गं तू रानी ‘ या मालिकेमध्ये..”