छत्रपती संभाजी महाराजाची शौर्यगाथा उलगडणार ,शिवरायांचा छावा..

दिग्पाल  लांजेकर  लिखित आणि दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा ‘ हा चित्रपट १६  फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध अभिनेता भूषण पाटील यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातील व्यक्तिरेखा भुरळ पाडणारी आहे.  शिवरायांचा छावा (shivrayancha chhava marathi movie) या चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा एक राजा म्हणून साकारलेले शौर्याचा इतिहास , या नेतृत्वाची शौर्याची पराक्रमाची माहिती रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

का पाहावा ? शिवरायांचा छावा (shivrayancha chhava marathi movie) 

या चित्रपटात १६८० ते १६८२ हा काळ कर्तृत्वाचा काळ पाहायला मिळतो.  यामध्ये त्यांनी स्वराज्याची दुसरी जबाबदारी स्वीकारलेली . स्वराज्यासाठी आखलेल्या योजना यामध्ये  त्यांचे प्रधानमंडळ , सहकारी  यांच्यासोबत त्यांनी केलेला महत्त्वाच्या मोहिमा हे सार चित्रपटात पाहायला मिळतं .  छत्रपती म्हणून विराजमान झाल्यावर मोघलांच्या व्यापाराचे केंद्र असलेल्या पुरणपोरावर केलेला हल्ला . या चित्रपटाला कलाटणी देणारे आहे.  या चित्रपटाची मूळ मोहीम मोघलांच्या व्यापरावर हल्ला करणे आहे , असं म्हटलं तरी  वावगं ठरणार नाही.

शिवरायांचा छावा चित्रपटातील  कलाकार  (shivrayancha chhava marathi movie) 

या चित्रपटात तृप्ती तोडणकर  , प्रसन्न केतकर  , अभिजीत श्वेतचंद्र ,  समीर धर्माधिकारी,  रवी काळे , दीप्ती लेणे , राहुल देव , इशा केसकर , ज्ञानेश वाडेकर याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि जिजाबाईंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी यांच्या मुख्य व्यक्तिरेखा पहायला मिळतात.(shivrayancha chhava marathi movie)


आणखी वाचा :सुप्रसिद्ध अभिनेता दिसणार ‘कुन्या राजाची गं तू रानी ‘ या मालिकेमध्ये.. 

shivrayancha chhava movie review
shivrayancha chhava movie review

शिवरायांचा छावा..(shivrayancha chhava marathi movie)

आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर दैदीप्यमान इतिहास उलगडलेला  कधीच नव्हता . २१ व्या शतकात अभ्यासपूर्ण पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर दिग्पाल  लांजेकर यांनी आणला आहे , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कथेच्या स्वरूपात कसा ताळमळ साधला आहे , हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

शिवरायांचा छावा..(shivrayancha chhava marathi movie)

अभिनेता भूषण पाटीलने याआधी ऐतिहासिक कोणतीही भूमिका साकारली नव्हती. या चित्रपटाच्या निमित्ताने भूषणने आपल्या शरीरावर विशेष मेहनत घेतली आहे .  या चित्रपटातील त्याची छबी किती आणि कशी प्रभावी आहे.  बोलकी , चित्तवेधक आहे. त्याचबरोबर प्रसन्न केतकर , राहुल देव,   इशा केसकर , ज्ञानेश वाडेकरयांचे ऑनस्क्रीन ॲक्शन सीन लक्षवेधी झाले आहेत.

शिवरायांचा छावा..(shivrayancha chhava marathi movie)

समीर धर्माधिकारी यांनी साकारलेला औरंगजेब त्यांचे संवाद , डोळ्यातील खुनशी अपेक्षकांसह लक्ष वेधून घेतात.या चित्रपटाचे भव्यदिव्य सेट्स पाहायला मिळतात.  वाई ,  सातारा ,  रायगड अशा ऐतिहासिक किल्ल्यावर या चित्रपटाच  चित्रीकरण  झालेले आहे , हे वास्तविक  चित्रीकरण   कथेला अगदी पुरेपूर न्याय देतात. जर तुम्हालाही ऐत्याहासिक  चित्रपट आवडतं असतील तर शिवरायांचा छावा‘ हा चित्रपट नक्की पहा. 

      हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

 

 

1 thought on “छत्रपती संभाजी महाराजाची शौर्यगाथा उलगडणार ,शिवरायांचा छावा..”

Leave a Comment