तितिक्षा तावडे लवकरच अडकणार लग्न बंधनात , फोटो शेअर करत दिली बातमी..

झी मराठी वरील टीआरपी मिळवून देणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी ‘ या मालिकेमध्ये तितिक्षा तावडे , अजिंक्य ननावरे ,ऐश्वर्या नारकर , राहुल मेहंदळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेमध्ये येणारे नवीन ट्वीस्ट  प्रेक्षकांना खेळवून ठेवते, या मालिकेतील  प्रमुख अभिनेता अजिंक्य ननावरे याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्याशी लग्नगाठ बांधली.  आता याच मालिकेतील अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. (Actress Titiksha Tawde will get married soon)

तितिक्षाने नुकताच सोशल मीडियावर सिद्धार्थ बोडके याच्याबरोबर केळवण्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला ‘आमचं ठरलं  ’ असं कॅप्शन देऊन दोघांनी आपल्या नात्याला होकार दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. झी युवा वरील ‘ तू अशी जवळी रहा ‘ या मालिकेने  ही जोडी घराघरात पोहोचली.  या मालिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले. मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली, याच ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले.  हे दोघे आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून फोटो शेअर करत असतात. तुमच्या दोघांमध्ये काय आहे ? असा प्रश्न असायचा . 

आणखी वाचा :निळू फुले यांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट ,निर्मात्यांनी केली घोषणा.. 

तितिक्षा  एक उत्तम चित्रकार आहे . तितिक्षाने(Actress Titiksha Tawde will get married soon) कलर्स मराठी वरील सरस्वती या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती.  तितिक्षाने  क्रिकेटर मिताली राज यांच्या  आयुष्यावर आधारित ‘शाब्बाश मिठू’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.  २०२१ मध्ये आलेल्या जयंती या चित्रपट देखील तितिक्षा  नायेकीची भूमिका साकारली होती. तितिक्षाची बहिण  खुशबू तावडे ही देखील मराठी मालिका विश्वात अभिनेत्री आहे. खुशबूने संग्राम साळवी याच्याशी विवाह केला आहे . खुशबू  सध्या झी मराठी वहीवरील ‘सारं काही तिच्यासाठी ‘ या मालिकेमध्ये काम करत आहे.(Actress Titiksha Tawde will get married soon) 

सिद्धार्थ बोडके हा देखील मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेता आहे सिद्धार्थ  नुकताच श्रीदेवी प्रसन्न या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे सिद्धार्थने मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके  ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.  ही जोडी कधी विवाह बंधनात अडकणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

1 thought on “तितिक्षा तावडे लवकरच अडकणार लग्न बंधनात , फोटो शेअर करत दिली बातमी..”

Leave a Comment