निळू फुले यांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट,निर्मात्यांनी केली घोषणा..

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते निळू फुले. ‘निळू भाऊ ‘ हे नाव सर्वांच्या  परिचयाचं. निळू भाऊ  यांनी १९५६ मध्ये ‘एक गाव बारा भानगडी ‘ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी या चित्रपटात साकारलेली ‘झेले-अण्णाची ‘ विनोदी खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली. विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर या नाटकात त्यांची खलनायकाची भूमिका विलक्षण प्रभावी ठरली. (film about Nilu Phule releasing soon)

निळू भाऊ यांनी सलग चाळीस वर्षे मराठी सह हिंदी चित्रपट सृष्टीत आणि रंगभूमीवर काम केले. आपल्या कारकीर्दमध्ये १४० हून अधिक मराठी चित्रपटात काम केले . नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात निळू भाऊंनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारणारे निळू भाऊंचे शहरी आणि ग्रामीण जीवनाकडे विलक्षण निरीक्षण होते. (film about Nilu Phule releasing soon)

आणखी वाचा : सायलीचा होणारा नवरा कसा आहे . सायलीने केला  खुलासा..

film about Nilu Phule releasing soon
film about Nilu Phule releasing soon

अशातच आता त्यांच्या जीवनावर एक मराठी चित्रपट येणार असल्याची बातमी सगळीकडे पसरत आहे. निळू फुले यांच्या जीवनावर आधारित लवकरच चित्रपट येणार आहे. श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचे निर्माते कुमार तौरानी यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, ‘निळू फुले यांच्या जीवनावर आधारित आम्ही चित्रपट बनवत आहे.’ या चित्रपट ची तयारी चालू आहे , सध्या आम्ही स्क्रिप्ट वर काम करत आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन हिरकणी , चंद्रमुखी या चित्रपटाचे  दिग्दर्शक प्रसाद ओक हे करणार  आहेत.  या चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी  यांची कंपनी करणार आहे. कुमार तौरानी यांनी प्रथमच ‘श्रीदेवी प्रसन्न ‘ हा मराठी चित्रपट निर्मित केला.  या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (film about Nilu Phule releasing soon)

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कुमार तौरानी यांनी निळू फुलेंवर चित्रपट येणार असे जाहीर केले. निळू भाऊंची व्यक्तिरेखा कोण साकारणार ? हे अद्यापही उघड झालेले नाही. निळू भाऊंनी मराठी सह हिंदी चित्रपटात देखील आपलं नाणं खणखणीत वाजवलं . त्यांनी मराठीत सिंहासन, हमाल दे धमाल,  शापित , पुढचं पाऊल ,  पिंजरा ,  वरात ,  भिंगरी , जैत रे जैत ,  नाव मोठं लक्षण खोटं , प्रेम प्रतिज्ञा अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या . त्याचबरोबर बिगबी अमिताभ बच्चन यांच्यासोबत कुली  या चित्रपटात देखील  झळकले. ‘ बाई वाड्यावर या ‘ हा निळू भाऊंचा फेमस डायलॉग जगप्रसिद्ध झाला.  मराठी चित्रपटसृष्टीतील अशा हरहुन्नरी कलाकाराच्या जीवनावर चित्रपट येणार यासाठी चाहते उस्तुक आहेत. 

1 thought on “निळू फुले यांच्या जीवनावर लवकरच येणार चित्रपट,निर्मात्यांनी केली घोषणा..”

Leave a Comment