मराठी कला विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून सायली संजीवच नाव अग्रेसर आहे. सायलीच पूर्ण नाव सायली संजीव चांदोस्कर असे आहे (Actress Sayali Sanjeev Surname Chandoskar) . सायलीने ‘ काहे दिया परदेस ’ या झी मराठी वरील गाजलेल्या मालिकेतून मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. सायलीने नाटक , मालिका , चित्रपटातून रसिकांच्या मनामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले.
सायलीने (Actress Sayali Sanjeev) अलीकडेच झिम्मा- २ आणि ओले- आले या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.काही दिवसांपूर्वी सायलीचा ३१ वा वाढदिवस झाला. तिच्यावर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सायली नेहमी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलते.
View this post on Instagram
आणखी वाचा : स्टार प्रवाह वर येणार घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका
सायलीला एका मुलाखतीमध्ये ‘तुझा जोडीदार कसा असावा ‘ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सायली म्हणाली, आपण आपला नवरा किंवा बॉयफ्रेंड मध्ये आपल्या वडिलांना बघत असतो. कारण त्या व्यक्ती इतके प्रेम आपण दुसऱ्या कोणावरही करू शकत नाही. कारण तीच इमेज आपल्या पार्टनरमध्ये बघत असतो.
सायली पुढे म्हणते,(Actress Sayali Sanjeev) आपण आपल्या आयुष्यातले वीस ते तीस वर्ष ज्या व्यक्तीबरोबर घालवतो, त्यावर आपण प्रेम करतो. आपले वडील आपल्यावर प्रेम करतात. माझ्या वडिलांनी माझ्यावर निस्वार्थी आणि खरेपणाने प्रेम केले आहे. तसच प्रेम मला मिळाले तर मी आता लग्नाला उभी आहे. असं सायली म्हणते.
सायलीने काहे दिया परदेस, शुभमंगल सावधान या मालिकेमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर सायलीने बस्ता , झिम्मा , झिम्मा 2, सातारचा सलमान, आटपाडी नाईट, गोष्ट एका पैठणीची, मन फकीरा, ओले आले , पोलिस लाईन यासारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गोष्ट एका पैठणीचे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सायली लवकरच ऋषी सक्सेना ह्याच्यासोबत समसारा चाप्टर १ या चित्रपटात झळकणार आहे. काहे दिया परदेस या मालिकेनंतर ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. ह्या दोघांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सायलीला बस्ता या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे .