स्टारप्रवाह वर येणार ‘घरोघरी मातीच्या चुली ‘ ही नवी मालिका..

स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’  ही मालिका टीआरपी मध्ये आघाडीच्या स्थानावर आहे. या मालिकेची निर्मिती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या ‘सोहम’ प्रोडक्शन निर्मिती संस्थेने केली आहे. ‘ठरलं तर मग ’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सोहम प्रोडक्शन आता नवीन मालिका स्टार प्रवाहवर (starpravah serial gharoghari matichya chuli) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

स्टारप्रवाह वाहिनी ही  टीआरपीच्या शर्यतीत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अव्वल स्थानावर आहे. आता लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी या वाहिनीवर नवी मालिका सुरू होणार आहे . ‘घरोघरी मातीच्या चुली ’ असं हया  मालिकेचे नाव आहे . (starpravah serial gharoghari matichya chuli ) या मालिकेच्या नावातच मालिकेचे कथानक दडलेले आहे.

घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत  ‘रंग माझा वेगळा ’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदे ही  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. कदाचित त्यामुळेच सुचित्रा बांदेकर यांनी रेशमाची  या मालिकेसाठी निवड केली असावी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे ही जानकी रणदिवे हे प्रमुख पात्र साकारणार आहे. नव्या मालिकेबद्दल रेश्मा म्हणाली, रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले , ही मालिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी मालिका ठरली.  प्रेक्षकांबरोबर मला उत्सुकता होती कि , मला ह्यापुढे कोणते पात्र साकारायला मिळणार . पण  स्टारप्रवाहने माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा जानकी साकाराची संधी दिली. जानकी ही मनमिळाऊ स्वभावाची ,  संयमी , सर्वांना समजून घेणारी आहे जानकीचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. (starpravah serial gharoghari matichya chuli)

आणखी वाचा : हास्यजत्रेमध्ये  फक्त बसून हसायचं काम करते , सई म्हणाली एक दिवस…

gharoghari matichya chuli serial
gharoghari matichya chuli serial

रेश्मा शिंदे हिच्यासोबत या मालिकेत सविता प्रभुनी,  प्रमोद पवार , उदयनेने ,  दीप्ती देसाई आणि सुनील गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.  त्याचबरोबर नवा गडी नवं  राज्य मालिकेतील बालकलाकार आरोही साम्ब्रे ही बालकलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे . या मालिकेचे दिग्दर्शन राहुल लिंगायत हे करणार आहेत. या मालिकेत रेश्मासोबत नायक म्हणून कोणता अभिनेता दिसणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात  ठेवण्यात आलेले आहे.ठरलं तर मग या मालिकेप्रमाणे घरोघरी मातीच्या चुली (starpravah serial gharoghari matichya chuli ) ही मालिका कितपत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार , हे मालिका प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

1 thought on “स्टारप्रवाह वर येणार ‘घरोघरी मातीच्या चुली ‘ ही नवी मालिका..”

Leave a Comment