सरोगसी या विषयावर भाष्य करणारा ‘ डिलिव्हरी बॉय ’ हा चित्रपट

सरोगसीसारख्या विषयावर ‘ डिलिव्हरी बॉय ’ (delivery boy marathi movie) हा चित्रपट नुकताच ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. मोहसीन खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटात प्रथमेश परब , पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरोगसी ही कायद्याने मान्यता असली तरी याचं वैज्ञानिक आणि भावनिक महत्त्व अजूनही मान्य करताना दिसत नाही. ‘ डिलिव्हरी बॉय ’  या चित्रपटाचे निमित्ताने या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विषय गंभीर असला तरी विनोदाची फवारणी करत हा चित्रपट प्रेक्षकांच मनोरंजन करतो.

का पहावा डिलिव्हरी बॉय चित्रपट (delivery boy marathi movie ) :

गंभीर विषय असला तरी कथेतून विनोदाची अचूक पेरणी केली आहे. कथेची सुरुवात होते , ती एका रियल इस्टेट असलेल्या प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापच्या सीनपासून . ज्या जोडप्यांना मुलं होत नाहीत, त्या जोडप्यांच्या पदरात सरोगसी पद्धतीने उपचार करून सुख टाकण्याचा प्रयत्न डॉक्टर अमृता देशमुख म्हणजेच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिची गावात एन्ट्री होते. पुढे कथेत रंजक वळण येते . रियल इस्टेट एजंट म्हणून काम पाहणारा पृथ्वीक प्रताप म्हणजेच ‘ ’चोच्या ’ आणि प्रथमेश परब म्हणजेच ‘भाऊ ’. हे दोघेजण अमृतासाठी वरदान ठरतात. पुढे कथेच्या वळणावर या दोघांना डॉक्टरांना मदत करणे खूप महागात पडते. गंभीर विषयाला विनोदाची चुरचुरीत फोडणी दिली आहे . चित्रपट (delivery boy marathi movie )पाहताना कुठेच कंटाळवाणा वाटत नाही.

डिलिव्हरी बॉय मधील कलाकार (delivery boy marathi movie )

प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप हे दोघेही कमालीच्या ताकतीचे अभिनेते . या दोघांची मैत्री एकांकिकेच्या काळापासूनची आहे.दोघांनाही त्यांच्या कामाचा अनुभव आहे . त्यांना त्यांचा विनोदाचा टाइमिंग माहिती आहे . पृथ्वीक प्रतापने अनेक मालिकांमध्ये काम केले, पण खरी ओळख त्याला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा ’ या कार्यक्रमाने मिळवून दिली.(delivery boy marathi movie)
या चित्रपटात दोघांचेही काही सीन आहेत ते पाहून प्रेक्षक खळखळून हसवतात . काही प्रसंगा टचकन डोळ्यात पाणी आणणारे देखील आहेत. चित्रपटात एक प्रसंग असा आहे कि ‘बाळाला जन्म देणे ,त्याच्या कळात सोसणे , हे एका स्त्री शिवाय कोणाला शक्य नाही . असं म्हणत स्त्रीशक्तीचा केलेला सन्मान पाहायला मिळतो ’ .

आणखी वाचा : तितिक्षा तावडे  लवकरच अडकणार लग्न बंधनात…फोटो शेअर करत दिली बातमी

डिलिव्हरी बॉय या चित्रपटाचे  दिग्दर्शक (delivery boy marathi movie ) :

मोहसीन खान याचा ‘ डिलिव्हरी बॉय ’ हा मराठीतील पहिलाच सिनेमा. सरोगसी सारख्या गंभीर विषय पडद्यावर आणण्याचे धाडस या दिग्दर्शकाने केले आहे . या चित्रपटात दाखवलेले काही प्रसंग , डोहाळे जेवणाचा प्रसंग ,असे काही प्रसंग प्रेक्षकांच्या मनात चुकीचा संभ्रम निर्माण करू शकतात, पण दिग्दर्शकाने आणि लेखकाने या कथेची मांडणी योग्य पद्धतीने मांडली आहे.

या चित्रपटातील  गाणी (delivery boy marathi movie ) :

चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांना पाय थीरकवायला लावणारी आहेत . ‘ भाऊंचा नाद खुळा ’ , ‘ डोहाळे सॉंग ’ही गाणी उत्तम झाली आहेत. चित्रपटगृहात भाऊंचा नाद खुळा हे गाणं वाजल्यावर प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवताना दिसतात.

डिलिव्हरी बॉयचा भन्नाट क्लायमॅक्स (delivery boy marathi movie ) :

चित्रपटाचा भन्नाट क्लायमॅक्स आहे . चित्रपट सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीशी खेळूवून ठेवतो. हॉस्पिटल मधील काही प्रसंगा टचकन डोळ्यात पाणी आणणारे आहेत . हा चित्रपट कुठेच कंटाळवाणा वाटत नाही. हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात जाऊन पहावा असा आहे.

1 thought on “सरोगसी या विषयावर भाष्य करणारा ‘ डिलिव्हरी बॉय ’ हा चित्रपट”

Leave a Comment