‘ प्रेमाची गोष्ट ’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री सोडणार मालिका..

टीआरपीच्या शर्यतीत स्टारप्रवाहाने बाजी मारली आहे. त्यातच या वाहिनीवर ‘ प्रेमाची गोष्ट ’ ही नवी मालिका सुरु झाली. अल्पावधीत  या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. . या मालिकेतील मुक्ता गोखले ही सर्वांचीच आवडती आहे.  मुक्ता आणि सागर हे दोघे शेजारी राहणाऱ्या दोन पात्रांच्या कथेवर आधारित मालिकेचे कथानक  आहे. सागर हा शांत आणि मुक्ता ही अतिशय उत्साही आहे. (premachi goshta serial famous actress tejashree pradhan)  काही दिवसांपूर्वी सागर आणि मुक्ताचा लग्न सोहळा पार पडला.या लग्नसोहळ्यात स्टार प्रवाहवरील विविध मालिकेमधील पात्रांनी  हजेरी लावली होती. या मालिकेमध्ये प्रेमाचे चढउतार पाहायला मिळत आहेत.

या मालिकेची कथानक दोन आगळ्या वेगळ्या पात्राच्या नात्यावर आधारित आहे. सागरची भूमिका अभिनेता राज हंचनले  याने तर मुक्ता हीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान हीने साकारली आहे. त्याचं बरोबर ह्या मालिकेत माधवी गोखले , इंद्रा कोळी ,  संजीवनी जाधव  , इरा परवाडे  , आयुष भिडे ह्या कलाकारांनीही  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुक्ता-सागरची जोडी ही आवडती  जोडी झाली आहे. तेजश्रीचा ५ जानेवारी रोजी ‘ पंचक ‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला . ह्या चित्रपट मध्ये तिची छोटी भूमिका असली तरी तिला माधुरी दिक्षित निर्मित सिनेमात अभिनय करता आला. महिन्याभरापूर्वी  तेजश्रीला मातृशोक झाला . त्यातून तिने स्वतः ला सावरले आहे.  पण काही कारणाने तेजश्री प्रधान  प्रेमाची गोष्ट या मालिकेतून ब्रेक घेणार आहे, असं सांगण्यात येत आहे. (premachi goshta serial famous actress tejashree pradhan)

हे ही वाचा :  वयाच्या १७ व्या वर्षी अमृता सुभाष  पडली होती ,  या कलाकाराच्या प्रेमात..       

premachi goshta serial actress tejashree pradhan
premachi goshta serial actress tejashree pradhan

ब्रेक घेण्याच कारण म्हणजे तेजश्रीला  चित्रपटात संधी मिळाली आहे, मालिका आणि चित्रपट या दोघांची वेळ जुळत नसल्याने काही काळासाठी ती या मालिकेतून ब्रेक घेणार आहे आणि चित्रपटाला वेळ देणार आहे.असं तिने सांगितले आहे ,  काही दिवस ती मालिकेमध्ये दिसणार नाही. तेजश्रीचा कोणता नवीन चित्रपट येणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.  लवकरच तेजश्रीचा ‘लोकशाही ‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात तेजश्री कोणत्या भुमिके मध्ये दिसणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेल . ‘ प्रेमाची गोष्ट ’ या मालिकेमध्ये नात्यामध्ये  अनेक आव्हाने येतात, जसे की त्यांच्या कुटुंबांचे विरोध, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक समस्या यांचे विश्लेषण योग्य पद्धतीने मांडले आहे.  प्रेमाची गोष्ट ’  ही मनोरंजक आणि विचार करणारी मालिका आहे.

    हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

1 thought on “‘ प्रेमाची गोष्ट ’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री सोडणार मालिका..”

Leave a Comment