मुक्ता बर्वेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी ,आम्ही दोघे लवकरच ….

मुक्ता बर्वे ही मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री.  मुक्ताने तिच्या अभिनय कारकीर्दीची  सुरुवात ‘रुसु नका ,फुगू नका ’ या नाटकातून केली. (actress mukta barve shares good news) नंतर तिने “देहभान”, “फायनल ड्रॅफ्ट”, , “छापा काटा”, “कोडमंत्र” “देहभान”,  “कबड्डी कबड्डी”  यासारख्या अनेक नाटकांमध्ये काम केले.तिने ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट ’अशा  अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे,  मुक्ता बर्वेने आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात ‘जोगवा ‘ या चित्रपटातून केली.या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते .त्यातच आत्ता अभिनेत्री मुक्ता बर्वेने  आनंदाची बातमी दिली आहे . 

मुक्ताने   ‘जोगवा’, ‘आघात’, ‘एकदा वगळ’, ‘मुंबई पुणे मुंबई 2’, ‘डबल सीट’  ‘बंदीशाळा ’ यासारख्या ४0 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुक्ताच चौकट मोडणार , सध्या रंगभूमीवर ‘ चारचौघी ’ हे मराठी नाटक सुरु आहे. नाटकात रोहिणी हट्टंगडी, पर्ण पेठे, कादंबरी कदम, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.’चारचौघी’ हे नाटक १५  ऑगस्ट १९९१ साली रंगभूमीवर आले होते. त्यावेळी या  वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर  , आसावरी जोशी,  आणि दीपा श्रीराम यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या. (actress mukta barve shares good news) स्त्रियांच्या निर्णयावर भाष्य करणार हे नाटक त्या वेळी खूप गाजलं होत. काही दिवसांपूर्वी मुक्ताचा ‘ वाय ’ हा चित्रपट आला , या चित्रपटामध्ये स्त्री संघर्षाची कहाणी मांडली आहे, स्त्री केवळ सहन करणारी नाही ,तर परिस्थिती विरुद्ध बंड करणारी आहे. असे या चित्रपटातून दाखवून दिले आहे. (actress mukta barve shares good news)

आणखी वाचा : ‘ प्रेमाची गोष्ट ’ या मालिकेतील मुख्य  अभिनेत्री सोडणार मालिका 

actress mukta barve shares good news
actress mukta barve shares good news

 मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हीने आजवर मालिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकाचं मनोरंजन केलं आहे. मुक्ताचा  सोशल मिडीयावर एक चाहता वर्ग आहे. दरम्यान मुक्ता बर्वेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. (actress mukta barve shares good news.) मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांची जोडी बऱ्याच वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहे.’ मुंबई-पुणे-मुंबई ’ या चित्रपटात मुक्ता आणि स्वप्नीलने एकत्र काम केलं आहे. त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट ’ या मालिकेतही ही जोडी छोट्या पडद्यावर झळकली होती. त्यानंतर आता मुक्ता आणि स्वप्निल दोघेही पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.(actress mukta barve shares good news.) ‘ नाच गं घुमा ’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात मुक्ता आणि स्वप्नीलची प्रमुख भूमिका असणार आहे. याशिवाय सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव असे दिग्गज कलाकर देखील या चित्रपटात झळकणार आहेत. मुक्ता आणि स्वप्नीलला एकत्र पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

    हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

 

1 thought on “मुक्ता बर्वेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी ,आम्ही दोघे लवकरच ….”

Leave a Comment