आयोध्येत आमंत्रण नसल्याने ‘आई कुठे काय करते ’ मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत…

२२  जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू रामलल्ला यांचा  प्राणप्रतिष्ठेचा सोहळा थाटात पार पडला. ह्या सोहळ्याला बरेच मोठ-मोठे  कलाकार , नेतेमंडळी , उद्योगपती हजर होते.ह्या सोहळ्याची  पूर्ण देशभर  चर्चा होती. ह्यातच आत्ता मराठी कलाकारांनीही आपलं मत व्यक्त केले आहे.  

 ‘आई कुठे काय करते ’ या मालिकेत  खलनायक साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी घराघरात पोहोचले.(aai kuthe kay karte fame actor milind gawali)  अभिनेते मिलिंद गवळी हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आयोध्येत प्रभू रामलल्ला यांचा  प्राणप्रतिष्ठेचाचा सोहळा थाटात पार पडला. यानिमित्त मिलिंद गवळी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे, ते पोस्टमध्ये असं म्हणतात…

कालचा दिवस फार मंगलमय होता,काल रामलल्ला  आयोध्येत  विराजमान झाले. काल बारा वाजून वीस मिनिटांच्या मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर , भारतात हिंदुस्थानात हा दिवस उजाडला .4000 वेगवेगळ्या पंथांचे साधू, ३०००हून अधिक VVIP अतिथी , शंभरहून अधिक प्रायव्हेट जेट विमान , विमानांना एवढ्या पार्किंगची सोय नसल्यामुळे वेगवेगळ्या राज्यात विमान पार्क केली होती , सुपरस्टार, कलाकार , खेळाडू . कालच्या दिवशी आयोध्या मध्ये आपण पण असायला हवं होतं ,असं असं मला  वाटत होतं. पण नंतर विचार केला की मला आमंत्रण दिलं नाही, कारण माझ्या घरी हीच राम आहे. वडिलांचं नावच ‘ श्रीराम ’ आहे.

आणखी वाचा :  मुक्ता बर्वेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी , आम्ही दोघे लवकरच ..

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

पण अयोध्येत आणि देशात हा उत्सव चालू असताना मी रामासारखं आपण आपलं कर्तव्य करत राहायचं असं ठरवलं .मी माझं काम म्हणजेच सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे शूटिंग करत होतो.(aai kuthe kay karte fame actor milind gawali).सकाळी सेटवर पोहोचल्यानंतर नमस्कार, गुड मॉर्निंगच्या ऐवजी ‘जय श्रीराम’ म्हणत सगळे एकमेकांचे स्वागत करत होते. आमचे सीन पण किती इंटरेस्टिंग होते बघा, त्याचा धाकटा भाऊ यश त्याला मिठी मारून ढसाढसा रडतोय, मग माझ्या म्हणजेच अनिरुद्धच्या म्हणजेच त्याच्या वडिलांच्या पाया पडून निघायला लागतो आणि मग अनिरुद्ध एक बाप मुलाला मिठी मारून रडतो. माझ्या डोक्यामध्ये सगळं वातावरण इतकं रामोमय झालं होतं की, सिरीयलच्या सीन्स मध्ये मला वनवास भरत भेट असं काही सहज जाणवत होतं. डोक्यामध्ये अनेक विचार येत आहेत की इतका छान रामोमे वातावरण अख्या जगात झाला आहे तर रामची शिकवण आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं मातृ पितृ भक्ती भावंडावर असीम प्रेम कर्तव्य त्याग कोणाही विषय कटूता न बाळगणे सतत प्रसन्न आणि आनंदी राहणे सत्याचा नेहमी विजय होतो असं काहीसं आपल्यामध्ये सुद्धा आपण आत्मसात करावं आणि पुढच्या पिढीलाही ते द्यावं.. जय श्रीराम…त्यांच्या या पोस्टने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलंय.

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

1 thought on “आयोध्येत आमंत्रण नसल्याने ‘आई कुठे काय करते ’ मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत…”

Leave a Comment