मराठी इंडस्ट्रीमधून गायब झालेली अभिनेत्री रेखा राव…सध्या काय करते ?

मराठी चित्रपटसृष्टी एकेकाळी  गाजवणारी अभिनेत्री आज चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. ९० च्या दशकात  या नायिकेला  तुफान प्रसिद्ध मिळवूनही ही नायिका प्रसिद्धीपासून दूर आहे.  ती अभिनेत्री म्हणजे ‘रेखा राव’.  रेखा राव या अमराठी असून त्यांनी मराठीत स्वतःचा एक वेगळा असा ठसा उमटवला. मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर,  महेश कोठारे  अशा दिग्गज कलाकारांसोबत ‘ रेखा राव ’ (famous marathi actress rekha rao)यांनी मराठी चित्रपट सृष्टीत काम केले आहे. प्रेम करूया खुल्लम खुल्ला , आमच्यासारखे आम्हीच , धरलय तर चावतय , शुभमंगल सावधान ! अशा बऱ्याच मराठी चित्रपटात रेखाराव्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.. 

त्या काळातील अभिनेत्री आणि आजही त्यांना वर्षा उसगावकर , अलका कुबल , किशोरी शहाणे , प्रिया बेर्डे , अश्विनी भावे , निवेदिता सराफ अशा अभिनेत्रीच्या तोडीसतोड असणारी  अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.मराठी चित्रपट सृष्टीतच  नव्हे  तर हिंदी चित्रपट सृष्टीतही  त्यांनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘हम दिल दे चुके सनम ’ या चित्रपटात त्यांनी आत्याची भूमिका साकारली होती.८० आणि ९० च्या दशकात त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपलं स्वतःचं नाव कमावलं पण काही काळानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीतून काढता पाय घेतला. (famous marathi actress rekha rao)

आणखी वाचा : सातव्या मुलीची सातवी मुलगी या मराठी मालिकेवर भडकले प्रेक्षक, काय फालतूपणा लावलाय …

Actress Rekha Rao kitchen
Actress Rekha Rao kitchen

आता बऱ्याच वर्षापासून त्या चित्रपट सृष्टी पासून दूर आहेत , पण एक काळ गाजवणारी अभिनेत्री आता काय करते असा प्रश्न पडतो ? रेखा राव  ह्या मुळच्या बैंगलोरच्या  आहेत.  त्यांचं बालपण पूर्णपणे बँगलोरमध्ये गेले.  शाळेत असल्यापासून त्यांना नृत्याची आवड होती. त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडेही घेतले आहेत. १९७९ च्या दरम्यान त्यांनी कन्नड चित्रपटातून कला विश्वात पदार्पण केले. कन्नड चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्या मराठी चित्रपट सृष्टीत आल्या. त्या वेळेच्या मराठी नायकांसोबत त्यांनी कामही केलं पण आता ही अभिनेत्री कला विश्वापासून दूर आहे त्या त्या बेंगलोर मध्ये स्वतःचा व्यवसाय करत आहेत . “आम्म्हास  किचन राव ” या नावाने स्वतःच हॉटेल सुरू केले  आहे.  कॉलेजच्या मुलांची गैरसोयी होऊ नये म्हणून त्यांनी घरगुती किचन सुरू केले आहे. (famous marathi actress rekha rao)

या किचनला चांगलीच पसंती मिळत आहे. त्यासोबत त्या ॲक्टिंगचे क्लासेसही घेत आहेत. हिंदी मराठी कन्नड आणि इंग्रजी या भाषेतून त्या ॲक्टिंगचे  क्लासेस घेतात. बेंगलोर मध्ये त्या वैयक्तिक आयुष्य आनंदाने जगत आहेत. रेखा राव ह्यांनी चित्रपटातच नाही तर मालिकांमध्येही काम केले आहे. बेंगलोर मध्ये त्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.

    हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

1 thought on “मराठी इंडस्ट्रीमधून गायब झालेली अभिनेत्री रेखा राव…सध्या काय करते ?”

Leave a Comment