“ओले आले ” हृदयस्पर्शी रोडट्रिपवरून आयुष्याचे धडे शिकणारा प्रवास…

२०२४ या नवीन वर्षाची सुरुवात ‘सत्यशोधक’ या बायोपिकने झाली . या वर्षात बरेचसे नवीन चित्रपट मराठी  सृष्टीत  आले. अभिनेते नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा मुख्य भूमिका असलेला  ‘ओले आले ‘ (ole ale new marathi movie)  हा नवाकोरा चित्रपट ५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला .बाप लेकाच्या नात्याची गोष्ट हलक्या -फुलक्या अंदाजात   या चित्रपटात मांडण्यात आली  आहे.  चला जाणून घेऊया कसा आहे हा चित्रपट . 

चित्रपटाची कथा  ओमकार लेले   ( नाना पाटेकर) आणि   आदित्य लेले  (सिद्धार्थ चांदेकर) या दोन बापलेकाच्या नात्याभोवती फिरते. आदित्य एक यशस्वी उद्योजक आहे,आदित्य लेले हा काहीतरी मिळवण्यासाठी  धावपळ करताना दिसतोय तर दुसरीकडे ओमकार लेले हे निवृत्त आयुष्य जगत आहेत . आपल्या मुलाने आपल्यासाठी वेळ काढावा , आराम करावा आणि इतर गोष्टींनाही वेळ द्यावा, असे  सतत मुलाला सांगत असतात. परंतु आदित्य आपल्या वडिलांशी  फारसा जवळ नाही. तो त्यांच्याशी बोलणे टाळतो आणि त्यांच्याशी वाद घालत असतो.एक दिवस, ओमकारला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तो कोमात जातो. आदित्यला त्याच्या वडिलांशी बोलण्याची संधी मिळते आणि तो त्यांचा पाठपुरावा करतो. त्याला त्याच्या वडिलांबद्दलचे अनेक सत्य समजतात आणि तो त्यांच्याशी जवळ येतो. अशा काही गोष्टी घडतात की त्यांच्या नात्याला एक वेगळंच वळण येतं. (ole ale new marathi movie) 

Ole Ale Marathi Review
Ole Ale Marathi Review

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केले आहे.चित्रपटाची कथा हळूवारपणे सांगितली आहे. कथा आणि संवाद प्रभावीपणे लिहिलेले आहेत. चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट आहे. नाना पाटेकर यांनी ओमकारची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यांनी ओमकारच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना समर्थपणे साकारले आहे. सिद्धार्थ चांदेकर यांनीही आदित्यची भूमिका चांगली साकारली आहे. या चित्रपटात ‘बाबुराव’ हे पात्र मकरंद अनासपुरे आणि ‘कियारा’ हे पात्र सायली संजीव हिने साकारले आहे.  या दोघांनीही आपल्या  भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. (ole ale new marathi movie) 

हे ही वाचा :- चाहत्याच्या कमेंटवर भडकली जुई गडकरी..आधी नीट माहिती काढा..नंतर बोला
‘(ole ale new marathi movie) चित्रपटाच्या पहिल्या सीन  पासून ते शेवटच्या सीनपर्यंत चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. बापलेकाच्या नात्याची घडी या कथेतून उलगडत जाते. “ओले आले” केवळ आनंदासाठीच नाही, तर विचार करण्यासाठीही प्रवृत्त करतो..तो वडील-लेकांच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करतो. आयुष्यात काही गोष्टी पैशापेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात हे आपल्याला आठववून देतो.ओले आले हा एक हळुवार, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी चित्रपट आहे. हा चित्रपट सर्वांनी एकदा तरी पाहावा.

 

1 thought on ““ओले आले ” हृदयस्पर्शी रोडट्रिपवरून आयुष्याचे धडे शिकणारा प्रवास…”

Leave a Comment