हास्यजत्रेमध्ये फक्त बसून हसायचं काम करते ,सई म्हणाली एक दिवस…

आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये ज्या अभिनेत्रीचं नाव येतं, ती अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने फक्त मराठीत मर्यादित न राहता बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हिंदी चित्रपटातील कामांसाठी तिला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सईने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. सई कधी बिकिनी तर कधी किसिंग सीनमुळे चर्चेचा विषय ठरली आहे .सईने सांगलीपासून आपल्या अभिनयाचा सुरू केलेला प्रवास यशाचा ठरला आहे. अधिकाधिक मेहनत करून तिने यशाची पायरी घा टली आहे. अजूनही तिला नकारात्मक प्रश्नांना सामोरे जावे लागते. (HasyaJatra judge Sai Tamhankar)

सई महाराष्ट्राची हास्यजत्रा ((Maharashtrachi HasyaJatra judge Sai Tamhankar).) या कार्यक्रमांमध्ये परीक्षकाची दुवा सांभाळत आहे . हे काम तिच्यासाठी अधिक जबाबदारीचा आहे .विनोदविरांच्या कामाचे निरीक्षण करायचं आणि प्रत्येक स्कीटनंतर टिप्पणी द्यायची . हे  सगळ्यात मोठी जबाबदारीचा काम आहे .  गेली अनेक वर्ष हे जबाबदारी सई उत्तमरीत्या पार पडते . यावरून सईला अनेकदा ट्रोललिगचा  सामना करावा लागतो , याच बाबत तिने ह्यावर भाष्य केले आहे . ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांमध्ये फक्त बसून हसायचं काम करते ’  .असं नेहमी तिला बोलल जात.

आणखी वाचा : म्हणून मी ऑडिशनमधून  पळून आले , श्रेया बुगडेने सांगितला अनुभव..

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 याचविषयी मुंबईत तक या कार्यक्रमांमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये सईला प्रश्न विचारण्यात आला , त्यावेळी सईने सडेत्तोर उत्तर दिलं . सई ताम्हणकरला ( HasyaJatra judge Sai Tamhankar)  आणि प्रसाद ओकला फक्त बसून हसायचं  असतं ,  यावेळी तुमचं काम नक्की काय असतं. असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सई म्हणाली, असं म्हणणाऱ्यांनी   एक दिवस आमच्या खुर्चीमध्ये बसून बघावं, आम्हाला कोणतीही स्क्रिप्ट दिलेली नसते. आम्हाला काय बोलायचे आहे , हे माहीत नसते, किती आणि कुठे  बोलायचं आहे हेही सांगितलेले नसते .  हे जर तुम्हाला जमलं तर या आणि आमच्या खुर्चीमध्ये  बसा , सईने या प्रश्नाचं अगदी  शांतपणे उत्तर दिलं. त्यासोबत सई म्हणाली , मी अशा ट्रोललिगकडे फारसं लक्ष देत नाही.  

 सईचा (HasyaJatra judge Sai Tamhankar) नुकताच श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली . हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडत आहे. सई तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. 

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

1 thought on “हास्यजत्रेमध्ये फक्त बसून हसायचं काम करते ,सई म्हणाली एक दिवस…”

Leave a Comment