मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे लवकरच डिझायनर सिद्धार्थ राऊतसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला आणि आता तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू आहे. इंस्टाग्राम स्टोरीमधून तिने ही झलक चाहत्यांना दाखवली.
थोडक्यात माहिती
| कोण | स्वरदा ठिगळे |
|---|---|
| होणारा पती | सिद्धार्थ राऊत (डिझायनर) |
| साखरपुडा | जानेवारी महिन्यात |
| पदार्पण | माझे मन तुझे झाले (2013, शुभ्रा) |
| गाजलेली मालिका | स्वराज्य सौदामिनी ताराराणी (सोनी मराठी) |
सविस्तर बातमी
सध्या मराठी कला विश्वात लगीन सराई पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री खुशबू तावडे, अभिनेत्री शिवानी सुर्वे तसेच अभिनेत्री पूजा सावंत हे कलाकार लग्न बंधनात अडकले. त्याचबरोबर आता एक मराठी प्रसिद्ध अभिनेत्रीही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
तिच्या घरात लग्नाची जोरदार तयारी चालू असल्याचा पाहायला मिळत आहे. ती अभिनेत्री ‘माझे मन तुझे झाले ’फेम स्वारदा ठिगळे आहे. स्वारदा ठिगळेचा जानेवारी महिन्यात सिद्धार्थ राऊत बरोबर साखरपुडा पार पडला. तिने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर ती आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी टाकत व्हिडिओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : हास्यजत्रेबाबत ओंकारने सोडले मौन, म्हणाला काही गोष्टींमुळे मला तडजोड करावी लागत होती..

या व्हिडिओमध्ये घरातील महिला मंडळी फुलांच्या माळा, बनवताना दिसत आहेत. स्वारदाने आई आणि सासू सोबत फोटो शेअर केला आहे. स्वारदा तिच्या हिरव्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. घरातील दिव्यांग सदस्यांचा पाया पडत फोटो शेअर केला आहे. स्वारदाचा होणारा नवरा हा डिझाईनर आहे. त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अजूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र फोटोंवरून लवकरच लग्नगाठ बांधणार असे दिसून येत आहे.
स्वारदाने २०१३ साली ‘ माझे मन तुझे झाले ’ या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केले. या मालिकेमध्ये तिने शुभ्राची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली. तसेच तिने २०१७ साली ‘सावित्री देवी ’या हिंदी मालिकेत काम केले. त्यानंतर तिने सोनी मराठी वाहिनीवर वरील ‘ स्वराज्य सौदामिनी ताराराणी ’ या मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारली होती. स्वारदा कधी लग्न बंधनात अडकणार. याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे.
हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :
- पायाला आणि बोटाला अक्षरशः पिशव्या बांधल्या, मांजरेकरांनी सांगितला आजारपणाचा अनुभव…
- छत्रपती संभाजी महाराजाची शौर्यगाथा उलगडणार, शिवरायांचा छावा..
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
स्वरदा ठिगळेचा होणारा नवरा कोण आहे?
स्वरदाचा होणारा पती सिद्धार्थ राऊत असून तो डिझायनर आहे.
स्वरदा ठिगळेने कोणत्या मालिकांमध्ये काम केले?
माझे मन तुझे झाले, सावित्री देवी (हिंदी) आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकांमध्ये तिने काम केले. नंतर ती प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत आली.
स्वरदाचा साखरपुडा कधी झाला?
जानेवारी महिन्यात तिचा सिद्धार्थ राऊतसोबत साखरपुडा झाला.











