प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे लवकरच अडकणार लग्न बंधनात…

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. गेला काही दिवसांपासून मराठीतील बरेच कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वानंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे ह्या अभिनेत्री लग्न बंधनात अडकल्या. आता त्यांच्या पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. (actor ajinkya nanaware will get married soon)  

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य ननावरे (actor ajinkya nanaware ). अजिंक्यने नुकतेच साखरपुडा केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अजिंक्यने शिवानी सुर्वे (shivani surve) हिच्यासोबत साखरपुडा केला आहे ‌ अजिंक्य आणि शिवानी बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते ते एक दुसऱ्याला डेट करत होते. दोघांच्या घरच्यांच्या परवानगीने त्यांनी साखरपुडा केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवानीने तिचा इंस्टाग्राम अकाउंट वर साडीचे फोटोज अपलोड केले होते. त्यावरून तिच्या लग्नाची तयारी चालली आहे अशी हिंट तिच्या चाहत्यांना मिळत होती. 

आणखी वाचा : या कारणामुळे सई ताम्हणकरला अचानक चित्रपटून काढून टाकलं.  मला मानसिक त्रास…

actor-ajinkya-nanaware-will-get-married-soon
actor-ajinkya-nanaware-will-get-married-soon

शिवानी सुर्वे ने  देवयानी या स्टार प्रवाहाच्या  मालिकेतून मराठी चित्रपट मालिका विश्वात पदार्पण केले. देवयानी या पात्राला सर्वांनी पसंत केले. पुढे शिवानी ने  जान ना दिल से दूर हिंदी मालिकेमध्ये ही काम केले. अजिक्य (actor ajinkya nanaware) आणि शिवानीची तू जीवाला गुंतवावे या मालिकेमुळे दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचं पुढे प्रेमात रुपांतर झाले. अचानक ही मलिका बंद झाली . दोघांची पुन्हा भेट घडून आली. त्यांच्यात प्रेम जुळत गेले. काही काळ रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर तेव्हा  त्यांनी घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले.घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला , हे एक आकर्षण आहे. तुम्ही थोडे दिवस  एकत्र राहून दाखवा असे घरचे म्हणाले . पुढे ते ४ वर्ष रिलेशनशिप राहिले. मग घरच्यांच्या परवानगीने त्यांनी लग्न करण्याचा निश्चय केला . 

अजिंक्य आणि शिवानीने नुकताच केलेला साखरपुडा चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यांच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. अजिंक्य हा सातव्या मुलीची सातवी मुलगी प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अजिंक्यने (actor ajinkya nanaware) पावनखिंड या सुपरहिट मराठी चित्रपटात जीवा महालाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेने सर्वांच्या मनावर राज्य केले..तर शिवानीने ट्रिपल सीट वाळवी झिम्मा २  यासारख्या चित्रपटात काम केले आहे तिचे हे चित्रपट हिट देखील झाले आहेत. २०१९ मध्ये तिने ‘बिग बॉस मराठी २’ मध्ये भाग घेतला आणि ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली.ट्रिपल सीट’ मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

         हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

 

1 thought on “प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे लवकरच अडकणार लग्न बंधनात…”

Leave a Comment