मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे . आज सई मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र सईचा प्रवास सोपा नव्हता . तिने तिच्या करिअर मध्ये अनेक आडथळ्याचा सामना केला आहे. सईने ‘ लोकमत ’च्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. , त्यावेळी सईने आपल्या करिअर बद्दल काही खुलासे केले. मला पहिला ब्रेक ‘ या गोजिरवाण्या घरात ’ या मालिकेतून मिळाला. मालिका संपल्यावर माझ्याकडे कोणतचं काम नव्हतं. त्यावेळी मी काही नाटकांच्या बँकस्टेजला काम केले. त्यानंतर मला ‘ बाबुरावला पकडा ‘ हा चित्रपट मिळाला, या चित्रपटाच्या निमित्ताने मला ‘ बँककोकला ’ जाण्याची संधी मिळाली. (sai tamhankar was suddenly removed from the film)
माझ्या सुरवातीच्या काळात मला खूप जणांनी मदत केली . आपल्या सिनेमा सृष्टीत अजूनही चांगली लोक आहेत. मला सुरुवातीला एक चित्रपट मिळाला होता . त्या फिल्म मध्ये माझं कास्टिंग झालं होतं , माझं सिलेक्शन झाल होत. सगळं काही ठरलं होतं. चित्रपटाची सर्व तयारी झाली होती. शुटींगला दोन दिवस बाकी आहेत तर कळाले कि, मला बदलण्यात आले आहे . माझ्या जागी दुसरी अभिनेत्री काम करणार आहे. मला चित्रपटातून काढून टाकले आहे. त्यामागं कारण देखील धक्कादायक होत.(sai tamhankar was suddenly removed from the film) माझ्या डोळ्यांमध्ये प्रोब्लेम आहे . असा त्या दिग्दर्शकांच म्हणंण होत. माझ्याशी काही न बोलता ,माझी काही शानिषा करता. हा निर्णय घेतला . त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते. मला मानसिक त्रास देखील झाला होता. त्यानंतर मी मला सावरले . मग हळहळू माझ्याकडे कामे येत गेली.
आणखी वाचा :प्रथमेश परबने सांगितला स्ट्रगल दिवसातील अनुभव..म्हणाला आमचं अर्ध पत्र्याचं…
View this post on Instagram
सई पुढे म्हणते , मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा मी मावशीकडे राहिले , माझ्या मावशीने आणि मामाने मला सपोर्ट केला . आपले काही नातेवाईक असतात, गावकरी मंडळी असतात. त्याचं अख्खा आयुष्य नाक मुरडण्यात गेले, ज्या नातेवाईकांनी सुरुवातीला मला टोमणे मारले ते आज माझं तोंड भरून कौतुक करतात. (sai tamhankar was suddenly removed from the film)
सईने दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत काम केले आहे , त्याबद्दल बोलताना सई म्हणते , ‘ नवरसा ’ ही माझी २०२१ मध्ये सिरीज . त्यामध्ये मी काम करत असताना मला भाषेचा प्रोब्लेम येत होता, मी तीन टेक गप्प बसले होते , माझ्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. त्यावेळी मी दिग्दर्शकाचा ओरडा खाल्ला होता. हे सर्व विजय सेतुपाथी समोर चालले होते . ते विजय सेतुपाथीने पहिले तेव्हा त्यांनी मला ट्रिक दिली , मी ती फॉलो केली . नंतर दुसरा डेक ओके झाला. सईने मराठीसह बॉलीवूड मध्ये काम केले आहे. तिने ‘मीमी ’ ,दुनियादारी , सनईचौघडे , तूहीरे अशा मराठी चित्रपटमध्ये काम केले आहे . तिने अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत आणि तिने नेहमी प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.
1 thought on “या कारणामुळे सई ताम्हणकरला अचानक चित्रपटातून काढून टाकलं. त्या दिग्दर्शकांच म्हणंण होत मी ….”