प्रथमेश परबने सांगितला स्ट्रगलच्या दिवसातील अनुभव..म्हणाला आमचं अर्ध पत्र्याचं घर..

‘ टाईमपास ’ या मराठी  चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेशने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मराठी सिनेमासृष्टीत त्याने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्रथमेशने बालक-पालक , डार्लिंग , झिपऱ्या ,टकाटक अश्या मराठी चित्रपटात तर द्रीषम १ आणि द्रीषम २ अशा हिंदी चित्रपटातही त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘टाईमपास’  मधील दगडू सर्वाना भावला , त्याच्या भूमिकेने प्रेकाक्षांच्या मनात घर केले. मनोरंजनसृष्टीत येण्यापूर्वी प्रथमेशने वयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष  केला आहे.(prathamesh parab shares his struggle story) सुरुवातीच्या काळात तो चाळीत राहत होता. त्याने दिलेल्या राजश्री वरील एका मुलाखतीत सुरुवातीच्या काळाचा उल्लेख केला.

    प्रथमेश परब लहानपणीच्या गोष्टी सांगताना म्हणतो. “ लहानपणी आम्ही, भाड्याने महाकाली परीसरात रहायचो. तिथं आमचं अर्ध पत्र्याचं आणि अर्ध भिंतीचं घरं होतं. त्या पत्र्याच्या घरातही आम्ही खूप सुखी होतो. आमच्या आजुबाजूला खूप सुखी होतो. आमच्या आजुबाजुला खूप छान-छान माणसं होती. काही दिवसांनी आम्ही थोड्याशा मोठ्या घरात रहायला गेलो. ते घर सुद्धा चाळीतच होतं. पण आमच्या हक्काचं होतं.माझ्या आई-बाबांनी त्या हक्काच्या घरासाठी स्वतः कष्ट केले, दागिने विकले आणि त्यामधुन ते घर घेतलं  होतं. सुरुवातीला त्यांचे  कष्ट मला  दिसायचे नाहीत पण, मी सातवी-आठवीत गेल्यावर विचार करायचो आपले आई-बाबा महिन्याच्या शेवटी दुसऱ्यांकडून पैसे का आणतात .हळूहळू या मला सगळ्या गोष्टीची जाणीव होऊ लागली . ”(prathamesh parab shares his struggle story)

आणखी वाचा :ग्रामीण विषय, शेती , वास्तविक कथानक “नवरदेव B.Sc. Agri”   चित्रपट 

प्रथमेश परब त्यांच्या संघर्षाची(prathamesh parab shares his struggle story) गोष्ट सांगताना , पुढे म्हणतो “ ही सगळी माझ्या आई-बाबांची पुण्याई आहे. तुमच्याकडे पैसा कमी असला तरीही  चालेल पण, माणसातील माणुसकी सोडून  चालणार नाही. चाळीत मी याच सगळ्या माणसांच्या सानिध्यात घडलो. आमची सकाळ ही नळावरची भांडण ऐकून व्हायची. त्या सगळ्या गोष्टीमध्ये वेगळाच आनंद होता. आजही ते सगळ मला आठवतं ‘टाईमपास ’ नंतर देखील मी चाळीत राहत होतो.माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी हळुहळु बदलत गेल्या आज जे काही मिळालय त्यासाठी मी खरंच खुप जास्त आनंदी व समाधानी आहे.”

 प्रथमेश परबचा लवकरच ‘डिलीव्हरी बॉय ’ हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वत्र  प्रदर्शित होणार आहे. यासोबतच २४ फेब्रुवारी २०२४ रोजी  प्रथमेश क्षितिजा घोसळकर सोबत  लग्नबंधणात अडकणार आहे. प्रथमेशच्या ‘टाईमपास’ मधील भूमिकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Comment