अचानक माझं नॉमिनेशन काढून टाकले. किरण मानेंच वक्तव्य चर्चेत…

किरण माने (Actor Kiran Mane) यांनी ‘मुलगी झाली हो ’ या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारले होते. अभिनयासोबत ते सोशल मीडियावर सक्रिय असतात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखडपणे ती आपली  मतं  मांडत असतात.  ‘मुलगी झाली हो ’  या मालिकेतून त्यांना अचानक काढून टाकण्यात आले, त्यावेळी राजकीय दबावातून मालिकेतून काढलं असा आरोप किरण माने(Actor Kiran Mane) यांनी केला होता. ‘ सातारचा बच्चन ’ असे किरण मानेंना ओळखले जाते. किरण माने हे नाव सध्या बऱ्याच वेळा चर्चेत आलेले आहे. ती आपली मते प्रखडपणे मांडताना त्यांना ट्रोल देखील केले जाते. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. 

किरण मानेंनी (Actor Kiran Mane) एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना बरेच प्रश्न विचारण्यात आले. त्याच प्रश्नांची उत्तरे देत किरण माने म्हणतात ,आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा नरेंद्र दाभोळकर हे निळू फुले ,श्रीराम लागू ,सदाशिव अमरापूरकर यासारख्या अभिनेत्यांना घेऊन अंधश्रद्धा विरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करायचे काम करत होते. नाटक, मालिकांमध्ये टॅलेंट पेक्षा वैयक्तिक संबंधांचा जास्त उपयोग होतो. व्यवसायिक नाट्यशेत्र हे विशिष्ट ठराविक विचार धारणेच्या लोकांनी काबीज केले आहे. प्रसिद्धी आणि लोकप्रियता या दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळे आहेत. त्यासोबत किरण माने पुढे म्हणतात.  मराठीत कोणताही स्टार नाही. कारण आपण त्यांना स्टार समजतच नाही.  अभिनेत्याला सामाजिक भान असणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर तुम्ही तुमचं मत परखडपणे मांडली नाही तर तुम्ही लोकप्रिय होणार नाही. प्रमाणभाषा शिकल्याशिवाय तुम्हाला नट होता येणार नाही. असा समज होता. 

आणखी वाचा :  ऑल दि बेस्ट’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार

त्याचसोबत किरण मानेंनी (Actor Kiran Mane) एक गौप्यस्फोट   केला. ते म्हणतात आपल्याकडे अवॉर्ड फंक्शन हा एकदम ठुकार कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमांमध्ये ठरवून लोकांना अवॉर्ड दिली जातात. असाच एक अनुभव किरण मानेंनी शेअर केला आहे. ते म्हणतात TV 9 या चॅनलने काही दिवसांपूर्वी अवॉर्ड फंक्शन जाहीर केले . या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर होते . हा सोहळा दिमाखात पार पडला. ह्या चॅनेलने काही नॉमिनेशन जाहीर केले, तेव्हा माझी मराठी मालिका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील ‘सिंधुताई माझी माय’  या मालिकेत सुरुवातीला माझा लीड रोल होता. त्या रोलला प्रचंड शेड होत्या . खेडेगावातील व्यक्ती संत तुकारामांचा भक्त असतो. तो कणखर ,  हळवा आणि संयमी असतो.  या पात्राला नॉमिनेशन असेल असे मला वाटले होते. मी सर्व यादी तपासून बघितल्या पण कुठेच मला नॉमिनेशन नव्हते. मग मी माझ्या चॅनलमध्ये फोन केला तेव्हा ते म्हणाले तुम्हाला नॉमिनेशन होते, हे ऐकून मला आश्चर्य वाटले ऐनवेळी माझं नॉमिनेशन काढून टाकलं. दुसऱ्या कोणत्यातरी नटाला माझं नॉमिनेशन दिल.  ह्याचं मला जराही दुःख नाही  ,  परंतु पात्र आहे त्याला नॉमिनेशन का नाही ही माझी खंत आहे. किरण माने (Actor Kiran Mane)ह्यांनी बिग बॉस मराठी ३  मध्ये भाग घेतला आणि ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. 

1 thought on “अचानक माझं नॉमिनेशन काढून टाकले. किरण मानेंच वक्तव्य चर्चेत…”

Leave a Comment