छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे ’बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi Season 5 ) . गेल्या काही दिवसांपासून या शोची सर्वत्र चर्चा रंगली होती . या शोच्या नवीन होस्टने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारण अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ऐवजी या सिझनचे होस्टिंग अभिनेते रितेश देशमुख करणार आहेत. गेल्या ४ पर्वाचे होस्टिंग अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर ह्यांनी केले होते . महेश ह्यांचा दरारा प्रत्येक स्पर्धकाला वाटत होता . पण रितेश ह्यांची लय भारी स्टाईल कशी असेल ? ह्यांच्या लय भारी स्टाईलने सर्वाना हा शो पाहण्यासाठी उस्तुक केले .
Bigg Boss Marathi Season 5
‘बिग बॉस मराठी’ पाचवं पर्व ह्याचा ग्रँड प्रीमियर २८ जुलै रोजी दिमाखात पार पडला . १०० दिवसांचा घरातील स्पर्धकांचा प्रवास सुरू झाला . यावेळी एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले , यात निक्की तांबोळी , वर्षा उसगांवकर , योगिता चव्हाण , अभिजीत सावंत , धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण , इरिना रोडाकोवा , वैभव चव्हाण , अरबाज पटेल , घन श्याम दरोडे , पुरुषोत्तम पाटील , आर्य जाधव , जान्हवी किल्लेकर , पंढरीनाथ कांबळे , निखील दामले .
‘ बिग बॉस मराठी ’ पाचवं पर्व सुरू झाल्यावर याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली . पहिल्या दिवसापासूनच घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून स्पर्धकांमध्ये वाद झालेले पाहायला मिळाले. बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात निकिता तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात वाद रंगला. सतत निक्की वर्षा उसगावकरांसोबत भांडताना दिसत होती. पहिल्याच दिवशी निक्कीने वर्षा उसगावकरांची अक्कल काढली .त्यानंतर तिने अनेक घरातील सदस्यां सोबत भांडण केली. मी बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हते , मराठी लोकांची मेंटॅलिटी मॅच होत नाही . असं आर्यशी भांडताना ती म्हणाली . तिचं हे वादग्रस्त विधान घरातील अनेक सदस्यांच्या मनाला चटका लावून गेले . तिच्या या विधानावर आणि वागण्यावर प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त होत होती तिला घराबाहेर काढण्याची मागणी होत होती . निक्की ह्या आधी कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात स्पर्धक होती . वर्षा उसगांवकर या एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि त्यांच्याशी तिने कसं वागावं याचं तिला अजिबात भान नाही का ? .निक्की तांबोळी विरोधात सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीं आणि नेटकरी आपली मतं व्यक्त करत म्हणाले ,निक्कीने वर्षा उसगांवकरांची माफी मागावी ,अस मराठी सिनेसृष्टीतील कलाकार म्हणत होते .
हे देखील वाचा : ‘ठरलं तर मग!’ मालिकेतील काही ओळखीचे चेहरे ,चला तर जाणून घेऊया
Bigg Boss Marathi Season 5
‘बिग बॉस मराठी’ पाचवं पर्वाचा विकेंड वॉर शनिवारी ३ ऑगस्ट रोजी पार पडला यात रितेश देशमुख यांनी आपल्या स्टाईलने निक्कीला खरपूस शब्दांत चांगलेच सुनावले .‘ इथे मराठी माणसांची मेंटॅलिटी काढून मराठी प्रेक्षकांचा तुम्ही अपमान केलाय . या घरात ज्याला बोलायचं भान नाही ,त्याला इथे स्थान नाही.या आताच्या आता माझ्या मराठी माणसाची माफी मागायला हवी.’ तुम्ही ह्या आधी हि बिग बॉस मध्ये काम केले आहे . ह्याचा अर्थ असा नाही की , तुम्हाला सर्व येत . तुम्हांला इथे जर नीट राहता येत नसेल तर बिग बॉसची दारे आपल्यासाठी बाहेर येण्यासाठी उघडी आहेत . असा ओरडा रितेश ह्यांनी निक्कीला दिला .त्याचबरोबर हा आठवडा तुम्ही गाजवला असा म्हणत निक्कीचे कौतुक देखील केले . रितेशच्या या खरपूस समाचारानंतर निक्की तांबोळीने मराठी प्रेक्षकांची माफी मागितली . माझ्याकडून असे पुन्हा कोणते विधान होणार नाही असेही ती म्हणाली , त्याच बरोबर निक्कीने वर्षा उसगांवकरांची सुद्धा माफी मागितली . तुला माफ केले अस वर्षा उसगांवकर म्हणाल्या .
मराठी माणसाने काय करायचे आणि काय करायचे नाही हे तुम्ही का ठरवता ? असा प्रश्न रितेश ह्यांनी अंकिता वालावलकर विचारला . तुम्ही फक्त तुमचा गेम खेळा .. प्रेक्षक ठरवतील त्यांना काय करायचे आहे ते ,असे रितेश म्हणाले . मराठी संस्कृती जपते . मराठी बोलण्याचा , जेवण बनण्याचा प्रयत्न करते , ती म्हणजे इरिना रोडाकोवा . अस म्हणंत रितेश ह्यांनी इरिना रोडाकोवा कौतुक केले . त्याच बरोबर रितेश ह्यांनी घरातील अनेक सदस्याच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या .
पहिल्याच आठवड्यात वर्षा उसगावकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर योगिता चव्हाण, आणि पुरुषोत्तम दादा पाटील नॉमिनेटेड झाले होते. पण सर्व रसिक प्रेक्षकांनी सूरज चव्हाणला सेफ केले . सूरजला मिळालेल्या वोटिंगमुळे नॉमिनेटेड होण्यापासून वाचले. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांना घराबाहेर जावं लागलं आहे. ‘रामकृष्ण हरी’ म्हणत पुरुषोत्तम पाटील घराबाहेर पडले ’.ह्या पुढे अजून काय पाहायला मिळणार आहे ते औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचायला आवडेल .