’लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील कलाकारांची नावे

Laxmichya Pavlani Cast : स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका म्हणजे ’लक्ष्मीच्या पावलांनी’. काही दिवसांपूर्वी या मालिकेत कलानिधी  आणि अद्वैत यांचा लग्न सोहळा पार पडला. ह्या मालिकेतील नवा ट्विस्ट प्रेक्षकांना खेळवून ठेवत आहे . या मालिकेत अनेक कलाकार मंडळी आहेत चला तर जाणून घेऊया.

Laxmichya Pavlani Cast Name : ’लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील कलाकारांची नावे

अभिनेता अक्षर कोठारी हा या ’लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत अद्वैत चांदेकर हे पात्र साकारत आहे,  अक्षरने आधी ‘ बांध रेशमाचे’,  ‘आराधना ’, ‘कमला ’ , ‘ चाहूल ’ , ‘ छोटी मालकीण ’ , ‘ स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.  अक्षरचा २०२० मध्ये ‘ दफ़नही शॉर्ट फिल्म आली होती , ह्यात इन्स्पेक्टर आपटे हि भूमिका केली होती.  स्वाभिमान मालिकेतील शंतनू सूर्यवंशी हे पात्र घराघरात पोहोचले.

अभिनेत्री ईशा केसकर ही या  ’लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत कलानिधी खरे हे पात्र साकारत आहेत ईशाने या आधी मंगलाष्टक वन्स मोर , याला जीवन ऐसे नाव ,  हॅलो नंदन यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे . त्याचबरोबर तिने  ‘ जय मल्हार’ या मालिकेतील बानू हे पात्र घराघरात पोहोचले , त्याचबरोबर तिने माझ्या नवऱ्याची बायको आणि आता सध्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपल्या अभिनयाची छाप वाढत आहे. तिचा गेल्या वर्षी सरला एक कोटी हा ग्रामीण कथेवर आधारित चित्रपट आला होता . ह्या चित्रपटातील सरला सर्वाना भावणारी होती . 

अभिनेत्री किशोरी अंबिये या ’लक्ष्मीच्या पावलांनी’  या मालिकेत संगीता खरे हे पात्र साकारत आहेत. किशोरी अंबिये यांनी झपाटलेला , जबरदस्त , सरकारनामा  , एक होती राणी , आबा जिंदाबाद अशा अनेक चित्रपटात काम केले आहे . दार उघड बये , सहकुटुंब सहपरिवार , माझ्या नवऱ्याची बायको , येऊ कशी तशी नांदायला . देवयानी . फु बाई फु यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

अभिनेत्री दिपाली पानसरे हे या मालिकेत रोहिणी चांदेकर हे पात्र साकारत आहेत . दिपाली पानसरे यांनी या आधी ‘देवयानी’ या मालिकेत काम केले आहे . त्यांची ही मालिका प्रचंड गाजली होती , त्यानंतर त्यांनी आई कुठे काय करते ? ह्या मालिकेत संजना हे पात्र साकारले होते पण काही कारणाने ते या मालिकेतून बाहेर पडल्या . आता लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत काम करत आहेत. 

अभिनेता ध्रुव दातार  या मालिकेत राहुल चांदेकर हे पात्र साकार आहेत. ध्रुवने झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ या मालिकेत काम केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ध्रुवने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे . पण या शिक्षणानंतर ध्रुव  मॉडेलिंगकडे वळला . संजय पवार लिखित ‘मान्यतेच्या झग्याखाली’ या नाटकातून ध्रुवने  अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले .या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत दिलावर खानच्या भूमिकेत  ध्रुव दिसला होता. 

Laxmichya Pavlani Cast name
Laxmichya Pavlani Cast name

Laxmichya Pavlani Cast : ’लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील कलाकार

अभिनेता  ऋत्विक तळवलकर या ’लक्ष्मीच्या पावलांनी’,मालिकेत सोहम चांदेकर हे पात्र साकारत आहे. ह्याने या आधी विविध मालिकांमध्ये कामं केली आहेत .अभिनेत्री  मंजुषा गोडसे या ’ लक्ष्मीच्या पावलांनी’.  मालिकेत  सरोज चांदेकर हे पात्र साकारत आहे. मंजुषा गोडसे  ह्यांनी या आधी मराठील बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे . 

अभिनेते मिलिंद ओक  या ’ लक्ष्मीच्या पावलांनी’.  मालिकेत भालचंद्र चांदेकर हे पात्र साकारत आहे. ह्यांनी  या आधी अनेक मालिकांमध्ये कामं केली आहेत. अभिनेत्री  अपूर्वा सपकाळ या  या मालिकेत’ नयना खरे  हे पात्र साकारत आहे. अपूर्वाने ह्या आधी आभाळाची माया ह्या मालिकेत काम केले आहे . अभिनेत्री  रोहिणी नाईक या ’ लक्ष्मीच्या पावलांनी’ काजल खरे हे पात्र साकारत आहे. ह्यांनी  या आधी अनेक मालिकांमध्ये कामं केली आहेत . 

अभिनेता  अभय खडापकर  या मालिकेत दिनकर खरे हे पात्र साकारत आहे. अभिनेत्री  लीना आठवले  या मालिकेत रजनी चांदेकर हे पात्र साकारत आहेत. लीना  ह्यांनी ह्या आधी प्रेमास रंग यावे ह्या मालिकेत काम केले आहे अभिनेता  सतीश आगाशे – या मालिकेत श्रीकांत चांदेकर हे पात्र साकारत आहेत . मराठीतील अनेक मालिकांमध्ये कामं केली आहेत . ’ लक्ष्मीच्या पावलांनी’ ही गाटचोरा ह्या मालिकेचा रिमेक आहे . कलानिधी आणि अद्वैत ह्याच्यात होणारे वाद , रुसवे , फुगवे पाहण्यासारखं आहे .

 

  हे ही तुम्हांला वाचायला आवडेल.

Author

  • Marathi Filmy Adda

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

Leave a Comment