Satyashodhak marathi movie review : सत्यशोधक मराठी चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी जीवनावर आधारित आहे. सत्यशोधक ’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे . समाजातील रूढी परंपरा मोडून शिक्षणाचे महत्त्व समजून देण्यासाठी ज्योतिबांनी केलेल्या अथक परिश्रमाची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे . स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी आणि समाजातील अन्यायकारक व्यवस्थेला तडा द्यावा म्हणून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी घेतलेले महत्त्वाचे पाऊल या चित्रपटातून मांडले आहे . “सत्यशोधक” या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी, तर सावित्रीबाईंची भूमिका राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे.
सत्यशोधक चित्रपटाची कथा : या चित्रपटाची सुरुवात पुण्यातील वाड्यातील लग्न सोहळ्याने होते, ते लग्न म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं असतं. जणू प्रेक्षकांना त्या काळातल्या समाजात घेऊन जातो. १९व्या शतकाच्या सुरुवातीतील सामाजिक परिस्थिती, जातीय व्यवस्था, इंग्रज सरकारचा कारभार, समाजसुधारकांची विचारसरणी अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडल्या जातात. या चित्रपटात आपण पहातो , शिक्षणाची महत्त्वपूर्णता सांगण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ज्योतिबांनी कशा प्रकारे सामाजिक संघर्ष केला. स्त्री शिक्षणासाठी घेतलेला वसा ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना करून तत्कालीन समाजापर्यंत त्यांचे विचार पोहोचवणे म्हणजे ‘सत्यशोधक चित्रपट.
सत्यशोधक चित्रपटातील कलाकार : चित्रपटाच्या यशात कलाकारांची भूमिका मोठी असते, विशेषत: बायोपिकमध्ये. संदीप कुलकर्णी यांनी ज्योतिबांच्या भूमिकेला न्याय दिला असून, त्यांच्यातील ताकद, विचारांची दृढता आणि शुद्धतेचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. त्याचबरोबर, राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाईंची भूमिका साकारताना चेहऱ्यावरील भावना आणि हावभावांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा आणि रवींद्र मखने यांसारख्या कलाकारांनी आपापल्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कलाकारांनी चित्रपटातील पात्रांमध्ये जीव ओतला आहे, ज्यामुळे “सत्यशोधक” चित्रपटाला एक भक्कम आणि वास्तविकता प्रदान झाली आहे.
लेखन आणि दिग्दर्शन : एखाद्या थोर पुरुषाच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनवणे अशक्यच काम. नुसत्या घटना न दाखवता त्यातून नक्की काय दाखवायचे आहे , हे लेखक आणि दिग्दर्शकापुढे एक आव्हानात्मक असतं, पण नेमकेच विचार घेऊन योग्य पद्धतीने विचार मांडत निलेश जळमकर यांनी चित्रपटाचे कथन आणि दिग्दर्शन केले आहे . त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीने प्रभावी विचार मांडत, महात्मा ज्योतिबांचे जीवन आणि त्यांची कर्तृत्व सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शिक्षणाचा उद्देश हा आहे, माणूस घडवणार ,मग स्वतःच्या बुद्धीने सत्य असत्य तपासून ,आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणे. ” असे महात्मा जोतिबांचे विचार. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व्यापक आहे, त्यांच संपूर्ण कार्य चित्रपटात दाखवणे खूपच कठीण आणि आव्हात्मक आहे, एकोणिसाव्या शतकातील पुण्यातील जुने वाडे ,घरदार त्याचबरोबर वेशभूषा त्या काळाचा उभा केला आहेएकोणिसाव्या शतकातील पुण्यातील जुने वाडे ,घरदार त्याचबरोबर वेशभूषा त्या काळाचा उभा केला आहे .चित्रपट आपल्याला एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घेऊन जातो. चित्रपटात घडणाऱ्या प्रत्येक घटनांमध्ये सामाजिक क्रांतीचा संदेश आहे, जो आजही महत्त्वपूर्ण आहे.
संगीत आणि पार्श्वसंगीत : या चित्रपटाचा संगीत अमित राज यांनी केले असून या चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत अगदी आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देते.मोजकेच प्रसंग आणि महत्त्वाच्या घटनांची योग्य जुळवणी करत महात्मा ज्योतिबांचे विचार त्यांचे कार्य योग्य पद्धतीने मांडले आहेत, ज्या क्षणी महात्मा ज्योतिबांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचा प्रवास प्रेक्षकांच्या मनात अजून खोलवर रुजतो.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि चित्रपटाचा परिणाम : “सत्यशोधक” चित्रपट पाहून प्रेक्षकांना ज्योतिबा फुले यांचे खडतर जीवन आणि त्यांच्या ध्येयासाठीची धडपड अधिक स्पष्टपणे कळते. महात्मा ज्योतिबांचे योगदान आजच्या समाजासाठी प्रेरणादायक आहे, आणि या चित्रपटातून प्रत्येकाने त्यांचे कार्य कसे असावे, हे समजून घ्यावे असे संदेश दिले गेले आहेत. समाजातील लोकांनी, विशेषत: तरुण पिढीने या चित्रपटातून शिकावे असे विचार मांडले आहेत. ह्या चित्रपटाचे एकूण Collection 2.6 CR झाले आहे .
थोडक्यात : हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीशी खेळवून ठेवतो. सत्यशोधक हा एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण चित्रपट आहे .”सत्यशोधक” चित्रपटातील कथानक, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत या सर्वांनी एकत्र येऊन हा चित्रपट प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण बनला आहे. हा चित्रपट सर्वांनी एकदा तरी पाहावा.
FAQ
Q.1 Satyashodhak movie release date?
Ans : ५ जानेवारी २०२४
Q.2 Satyashodhak movie Worldwide collection
Ans : Collection 2.6 CR
हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :
1 thought on “सत्यशोधक चित्रपटातून ज्योतिबाचा खडतर प्रवास उलगडणार..”