पायाला आणि बोटाला अक्षरशः पिशव्या बांधल्या , मांजरेकरांनी सांगितला आजारपणाचा अनुभव…

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिंद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माते महेश मांजरेकर. महेश मांजरेकरांनी आपल्या अभिनयाच्या , लेखनाच्या दिग्दर्शकनाच्या जोरावर  प्रेक्षकांची मने जिंकली. महेश मांजरेकरांचे (actor mahesh manjrekar)अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. मांजरेकरांनी ‘वास्तव’ या चित्रपटातुन दिग्दर्शनात पदापर्ण केले. १९१९ साली संजय दत्त ह्याचा लीड रोल असणारा वास्तव हा चित्रपट त्याकाळी खुप गाजला. वास्तव या चित्रपटाला त्यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

      महेश मांजरेकरांचा ‘ ही अनोखी गाठ ‘  हा नवाकोरा  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि अभिनेता श्रेयस तळपदेने पहिल्यांदा एकत्र काम केले आहे. या चित्रपटात मराठीतह हिंदी चित्रपटात काम करणारा अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री  गौरी इंगवले यांच्या मुख्य भूमिका आहेत.या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या ट्रेलर प्रदर्शित झाल्यांनतर महेश माजंरेकरांना (actor mahesh manjrekar) काही प्रश्न विचारण्यात  आले. ट्रेलर लॉंचच्या दरम्यान त्यांना कॅन्सर विषयी विचारण्यात आले. 

आणखी वाचा : मालिकांमधील  नायकांची प्रेमभाषा कशी आहे चला तर जाणून घेऊया…

  आपल्या आजारपणाबद्दल मांजरेकर म्हणाले, मला कॅन्सर झाला होता, तेव्हा मी शुटींग करत होतो. तुम्ही मरेपर्यंत कायम जिवंत असता. त्यामुळे आपण आयुष्य तसच जगलं पाहिजे. मला कॅन्सर झाल्यांच कळताच , मी मरेन हा विचार कधीच केला नाही  . कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर मी बीग बॉसच्या प्रमोचं शुटींग केल होत. तेव्हा मी माझ्या पायाला आणि बोटाला अक्षरशः पिशव्या बांधल्या होत्या . पिशव्या बांधून प्रमोचं शुटींग केलं होतं. मी हार मानली नाही. मला जेव्हा श्रेयशच्या आजाराबद्दल कळलं , तेव्हा मी त्याला कसलचं टेशंन घेऊ नकोस, आरामात  रहा,  असा सल्ला  दिला होता. दरम्यान बिग बॉस मराठी – ३  चं सीजन सुरु होण्याआधीच मुत्रासॅडचा कॅन्सर झाल्याचं कळालं होत. त्यातून  बरे होत त्यांनी या कर्यक्रमासाठी प्रमो शुट केला होता. वेदना होत असतानांही महेश (actor mahesh manjrekar) यांनी चेहऱ्यावर न दाखवता, प्रमोचं शुटींग केलं आणि त्या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन केलं.

     दरम्यान ‘ही अनोखी गाठ  ’ हा नवा चित्रपटचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर (actor mahesh manjrekar) ह्यानी केले आहे. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी पूर्ण महारष्ट्रात  प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाची चर्चा चाह्त्यामध्ये आहे.

Author

  • Marathi Filmy Adda

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

Leave a Comment