एखादी मालिका जेव्हा प्रसारित होत असते. तेव्हा त्या मालिकेतील पात्र आपल्याला जवळची वाटू लागतात. आपले आवडते कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो. सध्या TRP मध्ये अव्वल स्थानी असलेली मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. चला तर जाणून घेऊया ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi goshta cast) या मालिकेतील काही प्रमुख कलाकार.
‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta Cast) या मालिकेतील काही प्रमुख कलाकार मंडळी
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ता गोखले हे पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘गोजिरवाण्या घरात ’या मालिकेद्वारे मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. होणार सून मी ह्या घरची, प्रेमाची गोष्ट अगंबाई सासूबाई यासारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या, त्याचबरोबर ती सध्या काय करते ? , झेंडा , लोकशाही, पंचक यासारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले, दुःखातून सावरून ती या मालिकेमध्ये रमत आहे.
अभिनेता राज हंचनाळे हा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत सागर कोळी हे पात्र साकारत आहे. राजने ह्या आधी झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला ’ या मालिकेत सुरज ची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. राज अभिनेता बरोबर उत्तम मॉडेल देखील आहे. राजने आपल्या अभिनयाची सुरवात नाटकापासून केली.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही या मालिकेत सावनी भोईर च्या भूमिकेत दिसत आहे . अपूर्वा ने ह्या आधी झी मराठीवरील ‘आभास ’ या मालिकेद्वारे मराठी मालिका विश्वास पदार्पण केले. त्याचबरोबर तिने आभास, आराधना , तू जीवाला गुंतवावे , प्रेम , हे तू माझा सांगाती , रात्री स खेळ चाले २ यासारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रात्रीस खेळ चाले २ ह्या मालिकेतील शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडले. अपूर्वा मराठी बिग बॉस या रियालिटी शो मध्ये सहभागी झाली होती.
अभिनेत्री शुभांगी गोखले ह्या या मालिकेत माधवी गोखले हे पात्र साकारत आहेत . शुभांगी गोखले यांनी या आधी बाप माणूस , क्षणभर विश्रांती , बोक्या सातबंडे ,घरात गणपती , झेंडा बस्ता , अगंबाई अरेच्चा यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच बरोबर काहे दिया परदेस , श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या सारख्या अनेक मालिका मध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांना सखी नावाची मुलगी आहे . ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.
अभिनेत्री संजीवनी जाधव हे या मालिकेत इंद्रा कोळी हे पात्र साकारत आहेत म्हणजेच सागर कोळी यांच्या आईचे पात्र अभिनेत्री संजीवनी जाधव साकारत आहेत. संजीवनी जाधव यांनी याआधी मराठी मालिकांमध्ये काम केले आहे लक्ष्मी वर्सेस सरस्वती , ऑन ड्युटी 24 तास यासारख्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेते योगेश केळकर हे या मालिकेत मुक्ताच्या वडिलांचे पात्र साकारत आहेत. योगेश केळकर यांनी ह्या आधी शुभमंगल सावधान, एक घर मंतरलेलं यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
अभिनेता आयुष भिडे हा या मालिकेत ‘ लकी ’ हे पात्र साकारत आहे . आयुष ने आपल्या अभिनयाची सुरुवात महाविद्यालयीनपासून केली . एकांकिका , दीर्घांक त्यानंतर त्याने मराठी रंगभूमीवर कॉफी अंडर फाईव्ह फीट , विठ्ठला यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली . त्याचबरोबर त्याने मराठीतील विविध मालिकांमध्ये ही काम केले आहे. त्याचा ‘घोर ’नावाचा दीर्घांक सध्या रंगभूमीवर चालू आहे.
हे देखील वाचा : ‘घरोघरी मातीच्या चुली ‘मालिकेतील काही प्रमुख कलाकार ,चला तर जाणून घेऊया…
‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta Cast) या मालिकेतील काही प्रमुख कलाकार मंडळी
अभिनेत्री कोमल बालाजी ही ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi goshta cast) या मालिकेत स्वाती हे पात्र साकारत आहे . कोमलने ह्या आधी मराठीतील विविध मालिकांमध्ये ही काम केले आहे.
अभिनेत्री मृणाल शिर्के हि या मालिकेत मीहीका हे पात्र साकारत आहे . मीहीकाने फॅशन डिझायनिंग मधून आपले शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या अभिनयात रमत आहे. २०२१ मध्ये हरिओम या मराठी चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.
अभिनेता राजेश सुले हा या मालिकेत मिहीर हे पात्र साकारत आहे. राजस ने याआधी मराठीतील विविध मालिकांमध्ये आपले अभिनयाची छाप पाडली आहे.
बालकलाकार ईशा परवडे हि देखील या मालिकेत सई हे पात्र साकारत आहे. ईशाच्या अभिनयाचे प्रेक्षकांमध्ये कौतुक होत आहे. ईशाने ह्या आधी झी मराठी वरील विविध मालिका मध्ये काम केले आहे.
सध्या ह्या मालिकेचा TRP ६.९ एवढा असून ही मालिका मराठी TRP मध्ये दुसऱ्या स्थानी आहे . ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका हिंदी मालिकेचा रेमेक असून प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे .
हे ही तुम्हांला वाचायला आवडेल.