पत्नीच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी पासून दूर गेलेला , भूषण कडू सध्या काय करतोय?

 बिग बॉस , कॉमेडी एक्सप्रेस, हास्यजत्रामधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजेच भूषण कडू ( actor bhushan kadu) . भूषणने छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. भूषणने ‘श्यामची मम्मी’ ,’एक डाव भटाचा’,  ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘बत्ती गुल पॉवरफुल’, ‘भूताची शाळा’,  या काही चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. अनेक नाटकांतही भूषणने काम केले आहेत.. भूषण हरहुन्नरी  आणि मेहनती कलाकार म्हणून प्रेक्षकांना माहिती आहे.

दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा हा कलाकार वैयक्तिक आयुष्यात मात्र एकाकी शांत झालाय. मालिका आणि चित्रपटांमध्ये तो सध्या  दिसेनासा झालाय . त्याच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि होत्याचं नव्हतं झालं. २०२० -२१  मध्ये कोरोनासारख्या महामारीमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कित्येकांनी आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना गमावलं. त्यातच भूषणच्या कुटुंबाला याची झळ बसली आहे. 

आणखी वाचा : इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत  प्रिया बापाटने  चाहत्यांसाठी व्यक्त केला संताप्त .

२९मे २०२१ रोजी भूषणच्या पत्नीचा कादंबरीचा कोरोनाने निधन झालं . पत्नीच्या जाण्यानं भूषणला मोठा धक्का बसला. तो चित्रपट आणि सोशल मीडियापासून दूर झाला. कादंबरीचं वय केवळ ३९ वर्षे होत.  त्यांना प्रकीर्त मुलगा आहे. हसत्या खेळत्या कुटुंबाच मायेचा छत्र हरपल ‌. भूषण प्रसिद्धी झोतापासून दूर गेला . हातात आलेले सर्व मोठे प्रोजेक्ट सोडून दिले. भूषणच्या पहिल्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं, आणि यानंतर दुसऱ्या पत्नीचे निधन झाल्याने तो कोसळला होता. पत्नीच्या जाण्यानं भूषण एकटा पडला होता..  तो वाईट परिस्थितीशी झुंजत होता. ह्यातून भूषण ने स्वतःला सावरले आहे. 

actor bhushan kadu
actor bhushan kadu

भूषणचा मोठा चाहता वर्ग आहे. भूषण कुठे आहे ? भूषण कडू सध्या काय करतोय ?(actor bhushan kadu)  याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पत्नीच्या निधनानंतर भूषण २०२२ मध्ये स्मिता गोंदकर ने आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये भूषण दिसला होता. त्याला सर्व कलाकारांसोबत पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता.२०२२ मध्ये झी मराठी वरील हे तर काहीच नाही ह्या कार्यक्रमात गेस्ट म्हणून सर्वासमोर आला होता. भूषणला पाहून प्रेक्षक सुखावले होते. भूषण9actor bhushan kadu)  सध्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत नसला तरी तो पडद्याआड लेखनाची ध्रुवा सांभाळत आहे. बालनाट्य , नाटक यांचे लेखन करतोय. शिवाय तो अनेक शिबिरांमधून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करतोय. भूषण सध्या एकटाच  मुलाचा सांभाळ करत आहे . भूषण मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला हे मात्र नक्की. 

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

Leave a Comment