इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रिया बापटने चाहत्यांसाठी व्यक्त केला संताप्त ..

चित्रपट  , मालिका , नाटक आणि वेब सिरीज  या चारही माध्यमातून प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला . प्रिया बापटने “नवा गडी नवं राज्य” या मराठी नाटकात आघाडीच्या भूमिकेत काम केले. या नाटकाला खूप लोकप्रियता मिळाली आणि प्रिया बापटला या नाटकातील भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले. प्रिया बापटने “टाईमपास”, “आम्ही दोघी”, “टॉम आणि जेरी” यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले. तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.मुन्नाभाई एम. बी. बी. एस.”, “लगे रहो मुन्नाभाई” इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. ह्यातच आत्ता प्रिया बापटने एक इंस्टाग्राम वर स्टोरी  शेअर करत संतप्त व्यक्त केला आहे. नाट्यगृहांच्या वाईट अवस्थेवर नेहमीच मराठी कलाकार बोलत असतात. यावर नेहमीच वादंग होत असताना दिसून येतात.. एकीकडे बरीच नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, तर दुसरीकडे नाट्यगृहाची अशी वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. काही नाट्यगृहांमधील  असुविधामुळे कलाकारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो , याच असुविधामुळे  कलाकार वैतागलेले दिसतात.

आणखी वाचा : सायली अर्जुन वर हेरगिरी करत असताना प्रियाचा  दुर्दैवी अपघात..

Priya Bapat and umesh kamatexpressed her anger by sharing a post on Instagram
Priya Bapat and expressed her anger by sharing a post on Instagram

प्रिया बापट आत्ता ‘  जर तरच्या गोष्ट ’  या नाटका द्वारे प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे . ह्या नाटकात उमेश कामात , प्रिया बापट , आशुतोष गोखले , पल्लवी हे कलाकार या नाटकातून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत . १० वर्षानंतर उमेश आणि प्रिया एकत्र रंगभूमीवर काम करत आहेत. तरुण पिढीवर भाष्य करणार नाटक असून ह्या नाटकाला  सध्या या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे . ठीक ठीकाणी ह्या नाटकाचे प्रयोग देखील हाउस-फुल होत आहेत.  परंतु प्रियाने नुकताच एक इंस्टाग्रामवरील पोस्ट ने सर्वच लक्ष वेधून घेतलं आहे ,  नाटक हाउस-फुल झाल्यावर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणार गर्दी जमते.याच दरम्यान काही प्रेक्षक सामाजिक भान न बाळगता नाट्यगृह  अस्वच्छ करतात. नाट्य गृहामध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या , प्लास्टिक च्या पिशव्या , फेकून देतात. या बद्दल प्रियाने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर केली आहे . तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ‘ नाट्यगृहाची कचऱ्या मुळे झालेली  वाईट अवस्था पाहिला मिळत आहे . नाट्यगृह  स्वच्छ  ठेवणं ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा. नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार ? असा संताप्त प्रियाने व्यक्त केला आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टला मराठी कलाकारांचा पाठींबा मिळत आहे .

1 thought on “इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रिया बापटने चाहत्यांसाठी व्यक्त केला संताप्त ..”

Leave a Comment