सायली अर्जुन वर हेरगिरी करत असताना प्रियाचा दुर्दैवी अपघात..

‘ ठरलं तर मग ’ हीस्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका आहे. या कथेचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे. या मालिकेची कथा एका तरुण जोडप्याची आहे. सायली ही अनाथ  मुलगी असून ती एका आश्रमात लहानाची मोठी आहे . अर्जुन हा श्रीमंत , हुशार आणि पेशाने वकील आहे . एका अपघातामुळे ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. काही वेळा त्यांना वेगळे केले जाते , ते एकमेकांना विसरण्याचा प्रयत्न करतात. पण ते एकमेकांना विसरू शकत नाहीत. त्यांच्या प्रेमाला यश मिळते , ते एकमेकांशी लग्न करतात. आता ते हनिमुन करण्यसाठी माथेरानला जातात. 

‘ ठरलं तर मग ’ या मालिकेच्या येणाऱ्या भागात सायली आणि अर्जुन माथेरानच्या मोकळ्या हवेत वातावरणात फिरत असतात. अर्जुन सायलीला घोड्यावर फिरवत असतो, आजूबाजूचे सर्व लोक  त्यांना पाहत असतात. ह्यांचा पाठलाग प्रिया करत असते. ते खरे नवरा-बायको नाहीत , या सत्यचा शोध घेत असते  आणि  त्याचं शुटींग करते. 

आणखी वाचा : ‘ फ्रेंड रिक्वेस्ट ’ नात्याच्या बंधाचा वेगळा नाट्यानुभव देणारं हे नाटक..

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रिया ह्याचं शुटींग करून ठेवते .अस्मितेला फोन करते. प्रिया बोलते , अर्जुन आणि सायलीचे इतके वीडीओ आहेत कि तुला काय सांगू, ह्यातून नक्कीच सिद्ध होईल कि हे खरे नवरा बायको नाहीत ते , त्यावर अस्मिता म्हणते , ते  वीडीओ  पाठव , त्यावर प्रिया म्हणते , माझ्या फोनला  रेंज नाही , रेंज मध्ये आले कि , तुला मी पाठवते , त्यावर अस्मिता म्हणते , सर्व वीडीओ  जपून ठेव , आपल्याला केस संदर्भात उपयोगी येईल , कि अर्जुन सुभेदार आपल्या घरच्यांना फसवत आहे, तर केस काय न्याय देणार ..त्यावर प्रिया बोलते ..मला फक्त अर्जुनला मिळवायचं आहे . सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून कायमचं लांब करून ..मला अर्जुनच्या आयुष्यात यायचं आहे , अर्जुनला मिळवण्यासाठी मी काहीही करेन , असं म्हणून प्रिया फोन कट करते.  

प्रिया लपून-छपून अर्जुन सायलीचा पाठलाग करत  असते. त्यांचा पाठलाग करत असताना ती खोल दरीजवळ जाते. , प्रियाला खूप महागात पडते. तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते.  अचानक तिचा तोल जातो . प्रिया खोल दरीत कोसळणार असते, तिचा फोन खाली पडतो. प्रियाचा अपघात होतो . तिच्या फोन मध्ये सर्व पुरावे असतात. 

ह्यातून प्रिया वाचेल का ? अस्मितेला पुरावे मिळणार का ?  प्रियाने गोळा केलेले सर्व पुरावे घरच्यांना सापडणार का ? ते आपल्याला येणाऱ्या भागात पहायाला मिळणार आहे . या मालिकेला प्रेक्षकाकडून  चांगली प्रतिक्रिया मिळत आहे . 

1 thought on “सायली अर्जुन वर हेरगिरी करत असताना प्रियाचा दुर्दैवी अपघात..”

Leave a Comment