मालिका विश्वातील एक महत्त्वाची मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग ’ स्टार प्रवाह वरील ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेने टीआरपी मध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे. ही मालिका अल्पवधीत प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. या मालिकेत जुई गडकरी अमित भानुषाली यांची प्रमुख भूमिका आहे, त्याचबरोबर प्रियंका तेंडुलकर प्राजक्ता दिघे ज्योती चांदेकर सागर काळसेकर अशा दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. मालिका विश्वातील बरेचसे कलाकार नाटक आणि चित्रपट माध्यमाकडे वळलेले दिसतात.
आता लवकरच याच मालिकेतील एक अभिनेत्री वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर करत एक वेगळी बातमी दिली आहे. ठरलं तर मग या मालिकेतील खलनायका भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका तेंडुलकर लवकरच रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. फ्रेंड रिक्वेस्ट या नव्या कोऱ्या नाटकात ती प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे.
याच नाटकात तिच्यासोबत सुभेदार फेम अजय पुरकर, अतुल महाजन, आशिष पवार यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. ह्या नाटकाबद्दल बोलताना प्रियंका म्हणाली , ‘ फ्रेंड रिक्वेस्ट ’ ही अशी गोष्ट आहे , आजच्या पिढीला सर्वांनाच माहित आहे, पण पूर्वी सोशल मिडिया नव्हता तेव्हा पण एक दुसऱ्याला ‘ फ्रेंड रिक्वेस्ट ’ पाठवली जायची,मग ती पत्रातून , चिठ्ठीतून इत्यादी.‘ फ्रेंड रिक्वेस्ट ’ ही दोन पिढीतील भावना व्यक्त करणार नाटक आहे. ह्याला कोणत्या वयाचं बंधन नाही. हे नाटक मागच्या आणि आत्ताच्या पिढीला रिलेट होईल . नात्यांवर भाष्य करणार हे नाटकं आहे . आज तरुण पिढी मराठी नाटकांपासून दूर चालली आहे. तरी हे नाटक आवर्जुन पाहावं.
आणखी वाचा : आयोध्येत आमंत्रण नसल्याने ‘आई कुठे काय करते ’ मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
View this post on Instagram
या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी केले असून ते म्हणतात, की, ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हा लेखक प्रसाद दाणी याचा दीर्घांक होता. त्याचं उत्तम नाटक होऊ शकतं हे मला जाणवलं. आजच्या पिढीचं आणि नात्याच्या बंधाचा वेगळा नाट्यानुभव देणारं हे नाटक आहे. प्रियंकाच्या चाहत्यांनी आणि ठरलं तर मागच्या संपूर्ण टीमने तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये लागली आहे. या नाटकाचा शुभारंभ २५ जानेवारी २०२४ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे .हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे नक्की.
1 thought on “‘ फ्रेंड रिक्वेस्ट ’ नात्याच्या बंधाचा वेगळा नाट्यानुभव देणारं हे नाटक..”