सत्यशोधक चित्रपटातून ज्योतिबाचा खडतर प्रवास उलगडणार..

 ही कथा आहे स्त्री शिक्षणासाठी अहो -रात्र धडपड करणाऱ्या , समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या , सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अशा महान नायकाची. समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावा,  समस्त स्त्रीवर्गाने शिक्षण घ्यावे , म्हणून शिक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘ सत्यशोधक ’ हा मराठी चित्रपट ५  जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला . या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत अभिनेता  संदीप कुलकर्णी , सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत राजश्री देशपांडे यांनी साकारली आहे. (Satyashodhak movie will unfold the tough journey of Jyotiba) सत्यशोधक चित्रपटातून ज्योतिबाचा खडतर प्रवास उलगडणार आहे . 

या चित्रपटाची सुरुवात पुण्यातील वाड्यातील लग्न सोहळ्याने होते ते लग्न म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं असतं. सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्ताने आपण एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वर्धात जातो.  तेथील  राहणीमान, जातीय व्यवस्था , इंग्रज सरकारचा कारभार , त्यावेळची समाजसुधारक आणि सामाजिक व्यवस्था या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते.सत्यशोधक या चित्रपटाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण चरित्रपट  या चित्रपटात दाखवला आहे . यात त्यांचं बालपण शिक्षणासाठी असलेली तळमळ , संपूर्ण समाज सुशिक्षित आणि संस्कृत व्हावा म्हणून यासाठी असणारा त्यांचा संकल्प. समाजात असलेली  जातीय व्यवस्था आणि याच जातीय व्यवस्थेमुळे होणारे गंभीर समस्या . स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवण ,  स्त्री शिक्षणासाठी घेतलेला वसा ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना करून तत्कालीन समाजापर्यंत  त्यांचे विचार पोहोचवणे म्हणजे ‘सत्यशोधक  चित्रपट.

Satyashodhak movie will unfold the tough journey of Jyotiba
Satyashodhak movie will unfold the tough journey of Jyotiba

 कोणत्याही बायोपिकमध्ये  स्टारकास्ट हा महत्त्वाचा भाग असतो.  या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी , राजश्री देशपांडे यांच्यासह गणेश यादव ,  सुरेश विश्वकर्मा , रवींद्र मखने  या कलाकारांचीही महत्वाची भूमिका आहे. अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी ज्योतिबांच्या पात्राला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.सावित्रीबाई फुले  यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेते राजश्री देशपांडे यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे , त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव , वेगवेगळ्या छटा अगदी बोलक्या वाटतात.या चित्रपटात बरेचसे परिचयाचे आणि काही अनोळखी कलाकारांचेही चेहरे या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्यासमोर दिसतात.

हे ही वाचा – सत्तेच्या खुर्चीसाठी ग्रामीण राजकारणाचा चाललेला संघर्ष!आत्ता खूर्ची आपलीच !

एखाद्या थोर पुरुषाच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनवणे अशक्यच काम . नुसत्या घटना न दाखवता त्यातून नक्की काय दाखवायचे  आहे , हे लेखक आणि दिग्दर्शकापुढे एक आव्हानात्मक असतं.  पण  नेमकेच विचार घेऊन योग्य पद्धतीने विचार मांडत निलेश जळमकर यांनी चित्रपटाचे कथन आणि दिग्दर्शन केले आहे . “  शिक्षणाचा उद्देश हा आहे, माणूस घडवणार ,मग स्वतःच्या बुद्धीने सत्य असत्य तपासून ,आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणे. ” असे महात्मा जोतिबांचे विचार.  महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व्यापक आहे, त्यांच संपूर्ण कार्य चित्रपटात दाखवणे खूपच कठीण आणि आव्हात्मक आहे,  एकोणिसाव्या शतकातील पुण्यातील  जुने वाडे ,घरदार त्याचबरोबर वेशभूषा त्या काळाचा उभा केला आहे .चित्रपट आपल्याला एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घेऊन जातो. या चित्रपटाचा संगीत अमित राज यांनी केले  असून या चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत अगदी आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देते.मोजकेच प्रसंग आणि महत्त्वाच्या घटनांची योग्य जुळवणी करत महात्मा ज्योतिबांचे विचार त्यांचे कार्य योग्य पद्धतीने मांडले आहेत.चित्रपटाची दिग्दर्शन आणि पटकथाही चांगली आहे. चित्रपटाची कथा प्रभावीपणे सांगितली आहे आणि चित्रपटात सामाजिक संदेशही प्रभावीपणे देण्यात आला आहे.हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीशी खेळवून ठेवतो. सत्यशोधक हा एक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण चित्रपट आहे. हा चित्रपट सर्वांनी एकदा तरी पाहावा.

    हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

 

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

1 thought on “सत्यशोधक चित्रपटातून ज्योतिबाचा खडतर प्रवास उलगडणार..”

Leave a Comment