चला हवा येऊ द्या , फु बाई फु , यासारख्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री , कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडे .(Actress Shreya Bugade ). आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले . 26 जानेवारी 2024 रोजी श्रेयाने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले. तिने दादरमध्ये सी फुड नावाने रेस्टॉरंट चालू केले या हॉटेलमध्ये माशांचे वेगवेगळे प्रकार खवय्यांना खायला मिळणार आहेत. ह्या रेस्टॉरंट च्या उद्घाटनला मराठीतील दिग्दज कलाकारांनी हजेरी लावली होती. हे रेस्टॉरंट दादरच्या मध्यभागी असल्यामुळे लोकांना सोयीस्कर असेल . स्वत:च हॉटेल असावं असं स्वप्न होत. श्रेयाने(Actress Shreya Bugade Husband Name ) २०१५ मध्ये निखिल शेठ(Nikhil Sheth) याच्याशी विवाह केला.
काही दिवसांपूर्वी श्रेयाने (Actress Shreya Bugade) एका कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली , त्यावेळी ती बोलताना म्हणते. मी वयाच्या आठव्या वर्षापासून रंगभूमीवर काम करायला लागले. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होता होता , मला १३ बेस्ट अभिनेत्रीचे अवॉर्ड मिळाले. मग माझा प्रवास मालिका , नाटक या क्षेत्रात सुरू झाला. ती पुढे म्हणते, ऑडिशनमध्ये मी कधीच चांगला परफॉर्मन्स केला नाही . मला ऑडिशन म्हटलं की ,त्याची भीती वाटते . सुरुवातीच्या काळात मी खूप ऑडिशन दिल्या, पण कधी सिलेक्ट झाले नाही. आपल्याकडे ऑडिशन घ्यायची एक विशिष्ट पद्धत आहे. पूर्वी आपल्याकडे आर्टिस्ट कॉर्डिनेटर , मॉडेल कॉर्डिनेटर असायचे. आता त्यांची जागा कास्टिंग एजन्सी, कास्टिंग डिरेक्टर यांनी घेतली आहे. त्यावेळी काम मिळाल्यानंतर काही टक्के रक्कम त्यांना द्यावी लागायची. ऑडिशनला गेल्यावर तेथील वातावरण पाहून मला खूप टेन्शन यायचं. मग मी काही वेळा माझा नंबर यायच्या आधीच मी तिथून पळ काढायचे. काही वेळेस मला ओळखीने काम मिळायची. उद्या ऑडिशन आहे तर मला आदल्या रात्रीपासून झोप लागत नाही. मला ठाऊक नाही मला ऑडिशनची भीती वाटते .
आणखी वाचा : अचानक माझं नॉमिनेशन काढून टाकले. किरण मानेंच वक्तव्य चर्चेत
चला येऊ द्या हा कार्यक्रम फक्त प्रेक्षकचं बंद करू शकतात, कारण या शोला अजूनही पूर्वीसारखा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. असं म्हणतात काही काही कार्यक्रम त्यांचं नशीब घेऊन येतात तसाच चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आहे. गेली दहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
श्रेया बुगडे (Actress Shreya Bugade ) पुढेही म्हणते , माझ्यात नकला करण्याची एक कला आहे .कलाकार कधीच समाधानी नसतो. तो नेहमीच भुकेलेला असतो . सतत त्याला वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते. हे खर कलाकारच जीवन आहे. श्रेया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.श्रेया आत्ता अभिनयासोबत हॉटेलही सांभाळणार आहे.
हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :