‘ठरलं तर मग!’ मालिकेतील काही ओळखीचे चेहरे ,चला तर जाणून घेऊया

 

‘ठरलं तर मग!’ ही मराठी मालिका सध्या टीआरपी मध्ये प्रथम स्थानी आहे. प्रेक्षक सध्या या मालिकेकडे चांगलेच वळलेले दिसतात. ‘ रोजा ’ नावाच्या तमिळ टीव्ही मालिकेचा हा रिमेक आहे . ही मालिका ५  डिसेंबर २०२२ रोजी स्टार प्रवाहवर प्रसारित झाली. आत्तापर्यंत या मालिकेचे ४६५ भाग पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील कलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे , चला तर जाणून घेऊया या मालिकेतील काही प्रमुख कलाकार (Tharla tar mag cast name). 

‘ठरलं तर मग!’ मालिकेतील कलाकार (Tharla tar mag cast name)

अभिनेत्री जुई गडकरी (Actress Jui Gadkari) ‘ ठरलं तर मग! ’ (Tharla tar mag cast name ) या मालिकेत सायली पाटील ही भूमिका साकारत करत आहे. जुईने आपल्या अभिनयाची स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल ’ या मालिकेपासून सुरुवात  केली.  जुई मूळची कर्जतची आहे. जुईचे शालेय  शिक्षण कर्जतमध्ये  झाले . ‘पुढचं पाऊल ’ या मालिकेतील ‘कल्याणी ’ ही भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. सायली पाटील या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

अभिनेता अमित भानुषाली (Actor Amit Bhanushali) या मालिकेत अर्जुन प्रताप सुभेदार हे पात्र असा करत आहे. या मालिकेत अमित भानुषाली पेशाने वकील दाखवला आहे.  अमितने या आधी स्टार प्रवाहवर ‘मन उधान वाऱ्याचे’ तसेच ‘स्वराज्य संभाजी रक्षक ’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याचे गाण्यांची अल्बमही प्रदर्शित झाले आहेत. 

अन्नपूर्णा सुभेदार हे पात्र अभिनेत्री ज्योती चांदेकर (Actress Jyoti Chandekar ) ह्यांनी  या मालिकेत साकारले आहे .ज्योती चांदेकर यांनी या आधी पाऊलवान ,  तिचा उंबरठा यासारख्या मालिकांमध्ये आपली अभिनयाची छाप पाडली आहे. त्याचबरोबर त्यांनी मी सिंधुताई सपकाळ , ढोलकी , गुरु , दमलेल्या बाबांची कहाणी यासारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी मिसेस आमदार सौभाग्यवती या नाटकात देखील काम केले आहे ,२०१७ साली  नाट्य परिषदेच्या  पुणे शाखेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

अभिनेते माधव अभ्यंकर ( Actor Madhav Abhyankar ) हे ‘ ठरलं तर मग! ’(Tharla tar mag cast name )  ह्या मालिकेत महिपत हे पात्र साकार आहेत. माधव यांनी या आधी विश्वविनायक या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला  सुरुवात केली. त्यांनी विविध नाटकांमध्ये ही काम केले आहे. त्यांची ‘ रात्रीस खेळ चाले -२ ’ मालिकेतील अण्णा नाईक ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. माधव अभ्यंकर यांनी हंसा ,  पोस्टर बॉईज  , सांगतो ऐका यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. माधव अभ्यंकर आणि अशोक सराफ ह्यांचा  ‘लाईफलाईन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे . 

हे देखील वाचा : ‘ प्रेमाची गोष्ट ’ या मालिकेतील कलाकार

Tharla tar mag cast name
Tharla tar mag cast name

‘ठरलं तर मग!’ मालिकेतील कलाकार (Tharla tar mag cast name)

अभिनेते सागर तळाशीकर ( Actor Sagar Talashikar ) हे ‘ ठरलं तर मग! ’ या मालिकेत  रविराज किल्लेदार हे पात्र साकारत आहेत. रविराज यांनी ‘ चार दिवस सासूचे ’ , ‘ पंचक ’ ,  ‘अरे देवा ’ , ‘ बालगंधर्व  ’ , ‘ स्वरगंधर्व  सुधीर फडके’ यासारख्या अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

अभिनेता चैतन्य देशपांडे (Actor Chaitanya Sardeshpande ) हा ‘ ठरलं तर मग! ’  ह्या मालिकेत चैतन्य गडकरी हे पात्र साकारत आहे.  चैतन्याची वडील देखील मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. वडिलांकडून अभिनयाचे बाळकडू घेऊन चैतन्याने अभिनय आणि लेखन क्षेत्रात पाऊल टाकले. चैतन्य सरदेशपांडे लवकरच ‘ एक सुलता सवाल ’ ह्या हिंदी लघुपटातून अनोख्या  भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

अभिनेत्री शिल्पा नवलकर (Actress  Shilpa Navalkar ) ह्या ‘ठरलं तर मग! ’  या मालिकेत प्रतिमा रविराज किल्लेदार हे पात्र साकारत आहेत. शिल्पा नवलकर ह्या पेशाने लेखिका आहेत. शिल्पा नवलकर यांनी याआधी माया , वहिनीसाहेब , अजूनही चांदरात आहे , कुसुम  यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचा ‘ बाई पण भारी देवा’ हा चित्रपट चांगलाच गाजला आहे . 

अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Actress Mira Jagannath ) ही ‘ठरलं तर मग! ’  या मालिकेत साक्षी हे पात्र साकारत आहेत.. मीराने या आधी मराठीतील विविध मालिकांमध्ये काम केले आहे . मीराने बिग बॉस मराठी मध्ये काम केले आहे. 

तन्वी  पाटील  पात्र  अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर  (Actress Priyanka Tendolkar) हीने या मालिकेत साकारले आहे. प्रियांका आधी फुलपाखरू,  उनाड , पाहिले ना मी तुला , साथ दे मला , अशा मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे  ‘ फ्रेंड रिक्वेस्ट ’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चालू आहे. 

अभिनेते नारायण जाधव  (Actor Narayan Jadhav ) हे या मालिकेमध्ये  मधुकर पाटील हे पात्र साकारत आहेत. नारायण जाधव यांनी मराठीतील विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

अभिनेत्री मोनिका दाभाडे(Actress Monika Dabade ) ही  या मालिकेत अस्मिता प्रताप सुभेदार हे पात्र साकार आहेत. मोनिकाने या आधी गाभा , चिंतामणी , जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा ,  राजमाता जिजाऊ , लफडे यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी  (Actress Prajakta Kulkarni) ह्या या मालिकेत कल्पना प्रताप सुभेदार हे पात्र साकारत आहेत. त्यांनी या आधी धडाकेबाज , पूर , बाजार , दामिनी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे त्याचबरोबर चार दिवस सासूचे , का रे दुरावा ,  छत्रीवाली यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची धडाकेबाज मधील लक्ष्मीकांत बेर्डे सोबत ची केमिस्ट्री लोकांना प्रचंड गाजली होती. 

अभिनेते अतुल महाजन ( Actor Atul Mahajan  ) यांनी या मालिकेत प्रताप सभेत आहे हे पात्र साकारले आहे. अतुल यांनी या आधी धर्मवीर अनेक चित्रपटात काम केले आहे , 

अभिनेते ज्ञानेश वाडेकर(Actor Dnyanesh Wadekar)  हे या मालिकेत नागराज किल्लेदार हे पात्र साकार आहेत. ज्ञानेश्वर वाडेकर यांनी या आधी मराठीतील तू माझा सांगाती अशा  विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 तसेच या मालिकेत प्रतीक सुरेश , श्रद्धा केतकर-वर्तक , अपूर्व रांजनकर , दिशा दानडे , श्रेयश माने , सप्तश्री उगळे , शौर्य यादव , दिया राणे , मयुरी मोहिते यासारखे प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळतात. ‘ ठरलं तर मग! ’  ह्या मालिकेचे येणारे भाग प्रेक्षकांना खेळवून ठेवत आहेत .

   हे देखील वाचायला आवडेल .

Author

  • Marathi Filmy Adda

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

Leave a Comment