आजारपणाशी झुंज देत सागरचं जाऊ बाई गावात या शो मध्ये कमबॅक , सागरला पाहून स्पर्धक भावुक

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला कलाकार म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडे याचा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मोलाचा वाटा आहे. सागर कारंडे यानेसुरुवातीच्या काळात त्यांनी ‘फू बाई फू’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांच्यासोबत भाग घेतला होता. त्यांच्या जोडीने हास्यरसिकांच्या मनाला जिंकले आणि आठव्या पर्वात विजेता ठरले.chala hawa yeu dya fame sagar karande comeback as post master in jau bai gavat show) त्यानंतर त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोद-नाटक कार्यक्रमात विविध हास्यरम्य भूमिका साकारल्या. (त्यांची पोस्टमन म्हणून केलेली पत्रवाचन हृदयस्पर्शी असत आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणते,  पण काही दिवसांपूर्वी स्थानी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून ब्रेक घेतला, आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर सागर कारंडे पुन्हा एकदा पोस्टमन काकांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हे ही वाचा :- “ओले आले ” हृदयस्पर्शी रोडट्रिपवरून आयुष्याचे धडे शिकणारा प्रवास

झी मराठी वाहिनीवरील “जाऊ बाई गावात ”  या कार्यक्रमात सागर  कारंडे पोस्टमन काकांच्या भूमिकेत दिसतात. शहरातील मुली गावातील संस्कृतीला आपलंसं कसं करणार अशी ह्या कर्यक्रमाची थीम आहे. ”जाऊ बाई गावात”  या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळे नवीन टास्क करत असते.  ”जाऊ बाई गावात” या कार्यक्रमातील स्पर्धक बऱ्याच दिवसांपासून आपल्या आई-वडिलांपासून , घरापासून  दूर आहेत.  त्यांचीच पत्र पोस्टमन काका वाचून स्पर्धकांना भावुक करतात.  त्याचबरोबर या कार्यक्रमाचा सूत्रधार हार्दिक जोशी यांचेही पत्र वाचून हार्दिक जोशी याला भावूक करतो . हा शो सुरु होण्यापूर्वी हार्दिक जोशी याच्या वहिनीचा दुःखद निधन झालं. हार्दिक जोशी त्याच्या वहिणीच्या खूप जवळ होता , तिचे पत्र वाचून हार्दिक जोशी अश्रू अनावर झाले असे  दिसून येते . सागर कारंडे यांची पत्र वाचण्याच्या स्टाईलने त्याने घरातील सर्व स्पर्धकांना अगदी भावुक केले आहे. बऱ्याच दिवसानंतर सागर कारंडेने छोट्या पडद्यावर कमबॅक केल्याने त्याच्या चाहत्याने आणि प्रेक्षकांनी त्याचे स्वागत केले आहे. (chala hawa yeu dya fame sagar karande comeback as post master in jau bai gavat show)

chala hawa yeu dya fame sagar karande comeback as post master in jau bai gavat show
chala hawa yeu dya fame sagar karande comeback as post master in jau bai gavat show

नाटकाच्या दौऱ्यावर असताना अचानक त्याला अस्वस्थता आणि चक्कर आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.सागरला ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळे  बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.  अपुरी झोप आणि जागरणामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ऍसिडिटीचा त्रास झाला होता.  काही महिन्यानंतर सागरमध्ये बरेचसे बदल झालेले दिसून येतात . सागरने छोट्या पडद्यावर कमबॅक केल्याने प्रेक्षकांनी त्याच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे. (chala hawa yeu dya fame sagar karande comeback as post master in jau bai gavat show) लवकरच चला हवा येऊ द्या शो मध्ये येऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करावी अशी मागणी केली आहे .

        हे ही तुम्हांला वाचायला आवडेल  :

Author

  • मराठी फिल्मी अड्डा टीम

    मराठी फिल्मी अड्डा टीम ही मराठी फिल्मी अड्डाची ओळख दर्शवते. मराठी फिल्मी अड्डा हे सर्व मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन आहे. आमचे संकेतस्थळ मराठी चित्रपट, अभिनेत्री, अभिनेते आणि नवीन मालिकांबद्दल अचूक माहिती देण्यासाठी समर्पित आहे. आम्ही मराठी चित्रपटांबद्दल उत्कट आहोत आणि आमच्या वाचकांना उद्योगातील नवीनतम घडामोडींबद्दल अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

    View all posts

2 thoughts on “आजारपणाशी झुंज देत सागरचं जाऊ बाई गावात या शो मध्ये कमबॅक , सागरला पाहून स्पर्धक भावुक”

Leave a Comment