भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. एकीकडे तरुण पिढी शेतीपासून दूर चालली आहे , असे दिसून येताना , पण काही तरुण हे शेती मध्ये दिवसरात्र मेहनत करताना दिसते. त्यातच आत्ता “नवरदेव बीएस्सी .एग्रीकल्चर” ( Navardev BSc. Agri Marathi movie) हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
कथेतील नायक हर्षवर्धन ह्याने बीएस्सी .एग्रीकल्चर (Navardev BSc. Agri Marathi movie) केली आहे. तो शेती न करता शेती करण्यापेक्षा शेतीमालावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करायचा विचार करतो. शेतीमध्ये तो नवनवीन प्रयोग करत असतो. गावातील लोकांना शोतीविषयी माहिती देऊन त्यांना शिक्षित करत असतो. शेती करत असल्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी भेटत नसते. ज्या मुलींना तो पाहायला जातो, त्या मुलीच्या घरच्यांना पोरगा नोकरी वाला हवा असतो. त्यातच तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. याच कथेवर हा चित्रपट आधारित आहे.या चित्रपटाचा कालावधी २ तास ३० मिनिटे आहे. एकीकडे तरुण पिढी शेतीपासून लांब होत असताना दिसत आहे. पण काही तरुण हे शेती मध्ये दिवसरात्र झटत आहेत.. शेतकरी कसा धान्य पिकवतो , त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते. बाजारपेठात चांगला भाव न मिळाल्यामुळे धीर न सोडता, मालाला कसा विकतो. ह्यावर ह्या चित्रपटाची कथा मांडली आहे.
आणखी वाचा :पत्नीच्या निधनानंतर चित्रपट सृष्टी पासून दूर गेलेला भूषण कडू सध्या काय करतोय?
या चित्रपटाचे दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची कहाणी या चित्रपटात साध्या सोप्या पद्धतीने मांडली आहे, त्याच बरोबर हुंडा , महिलावरील अत्याचार अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे . एकीकडे शेतकरीच शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देत नाही. एकवेळ १० हजार पगार असलेला मुलगा चालेल पण ४ एकर शेती असलेला मुलगा चालणार नाही. अस विधायक चित्र चित्रपटात दाखवले आहे.
या चित्रपटात नायकाची भुमिका क्षितीज दाते आणि नायिकेची भूमिका प्रियदर्शनी इंदलकर हीने साकारली असुन त्यांनी त्याच्या भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे,त्यासोबतच मकरंद अनासपुरे, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे , छोटा पुढारी घनश्याम दरोडे असे उत्तम कलाकार या चित्रपटात पाहायला मिळत आहेत.
या चित्रपचटाचा(Navardev BSc. Agri Marathi movie) पहिला भाग मनोरंजक आहे तर दुसरा भागही विनोदी आणि विचार करायला भाग पाडतो. ह्या चित्रपटातील गाणी देखील उत्तम आहे. रॅप गाणे हे परिस्थिती जुळवून आणते. लाल चिखल हे रॅप काळजाला भिडते . चित्रपट शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकतो आणि ते खूपच वास्तविक वाटतेया चित्रपटाची कथा आणि पटकथा उत्तम असल्याने हा चित्रपट पुर्णपणे मनोरंजक करणारा आहे कुठेच या चित्रपटाची नकारात्मक बाजू नसल्याने चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.चित्रपटातील सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे. तुम्हाला ग्रामीण विषयावरील मराठी चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पहा.
हे ही तुम्हांला वाचायला आवडेल :
1 thought on “ग्रामीण विषय, शेती , वास्तविक कथानक “नवरदेव बीएस्सी .एग्रीकल्चर” चित्रपट”